पदांसाठी अर्ज प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू होणार होती पण गृह विभागाने नोटीस बजावून यासंदर्भात अपडेट दिली आहे. यानुसार तांत्रिक त्रुटींमुळे आता अर्ज प्रक्रिया २१ जानेवारीऐवजी २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख देखील १७ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे, जी पूर्वी १० फेब्रुवारी होती.
दहावी उत्तीर्णांना संधी
दहावी उत्तीर्ण उमेदवार आयबी सुरक्षा सहाय्यक आणि एमटीएस भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आपले शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पूर्ण केलेले असावे. उमेदवाराचे कमाल वय २७ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अर्ज कसा करायचा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा