अरेरे! बीडमध्ये हिटरचा शॉक लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

बीड: केज तालुक्यात असलेले पिंपळगाव या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीचा सकाळी चार वाजता हिटरला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच केज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. केज तालुका येथील पिंपळगाव या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे आणि त्यांच्या पत्नी सिंदुबाई सुरवसे यांना हीटर चा शॉक लागून हे दोघेही पती-पत्नी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुलांच्या आंघोळीसाठी पाणी तापवत ठेवलं, बादलीमध्ये हात घालताच शॉक लागला अन्…

सकाळी चारच्या सुमारास सिंधुबाई सुरवसे या आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी घरातील हिटर लावत असताना अचानक हिटरचा शॉक लागला. हे पाहून ज्ञानेश्वर सुरवसे त्यांना वाचण्यासाठी धाव घेतली असता त्यांनादेखील या हिटरचा तीव्र शॉक लागला. या दोघांचा या हिटरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती होताच केज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तेच पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्दैवी घटनेने पिंपळगाव सह केज तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

मन सुन्न करणारी घटना! इकडे बहिणीच्या लग्नाची धामधूम, तिकडे चुलत भावाचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

सुरवसे कुटुंबामध्ये सुरवसे यांची वृद्ध आई, सुरवसे यांचा मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार त्यांच्या पश्चात आहे. या घटनेमुळे गावात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र हिटरमुळे झालेल्या या दाम्पत्याच्या मृत्यूमुळे अनेक जण भयभीत झाल्याचे देखील पाहायला मिळते. आज अनेक घरांमध्ये पाणी तापवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिटरचा वापर केला जातो. या आधी देखील हीटरच्या शॉक मुळे अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, केजमधील या घटनेने तालुक्यात शोकाकुल वातावरण आहे.

Source link

accidentbeed local newselectric geyser shockheater shockhusband wife died heater shockबीड मराठी न्यूजहिटरचा शॉक मृत्यू
Comments (0)
Add Comment