हायलाइट्स:
- राज्यभरातील मराठा समन्वयकांसोबत नवी मुंबई येथे चिंतन बैठक झाली.
- नऊ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलन संदर्भात पुढील निर्णय या वेळी ठरले.
- खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यातील अनेक समन्वयक उपस्थित होते.
म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या व समाजाच्या इतर मागण्यांबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांची सद्यस्थिती याबाबत राज्यभरातील मराठा समन्वयकांसोबत नवी मुंबई येथे चिंतन बैठक झाली. नऊ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलना संदर्भात पुढील निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत राज्यातील अनेक समन्वयक उपस्थित होते. (a meeting of maratha coordinators will be held on august 9 to decide the next direction of the agitation)
कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर १७ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या. या मागण्यांच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने मागितलेला एक महिन्याचा अवधी संपला, तरी अजूनही या मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. यामुळे मराठा समाज नाराज आहे.
क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांबाबत काढलेला जी.आर. हा समस्येवर मार्ग काढण्याऐवजी संभ्रमावस्था वाढविणारा आहे. या जी. आर. मधील कित्येक बाबी स्पष्ट होत नसून, शासनाकडून उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यात आलेले नाही.
क्लिक करा आणि वाचा- ‘… वेळ आल्यास शिवसेना भवन फोडूही’; भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
यामुळे, ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांतीदिन’ निमित्त मराठा समन्वयकांची राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलनाची पुढी दिशा ठरवली जाईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- ‘ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिका निवडणुकीत दाखवून देऊ’