अंबानी घराण्याची सून राधिका मर्चंट कितवी शिकलीय? माहिती आहे का?

Radhika Merchant Education Details: मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा शाही थाटात पार पडला. आता लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. राधिक मर्चंटला यापूर्वीही अनंत अंबानींसोबत अनेकदा पाहिले गेले आहे. राधिक मर्चंट देखील मुकेश अंबानी आणि नीता यांच्यासोबत त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दिसली होती. दरम्यान राधिका मर्चंट कोण आहे? तिने कुठे शिक्षण घेतले? याबद्दल जाणून घेऊया.

राधिका मर्चंट ही एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. आणि ती तिच्या पालकांसह एन्कोर हेल्थकेअर या फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालक मंडळाचा भाग आहे. ती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ असलेले त्यांचे वडील भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत.

राधिका मर्चंटचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला असून ती गुजरातमधील कच्छची आहे. मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून तिने सुरुवातीचे शिक्षण घेतले. यासोबतच बीडी सोमनी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर राधिकाने न्यूयॉर्क विश्वविद्यालयातून राजकारण आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री पूर्ण केली.

Namita Thapar Education: सातशे कोटींचे नेट वर्थ, Shark Tank फेम पुणेकर नमिताचं शिक्षण किती? जाणून घ्या
आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंसहित त्यांची दोन मुले आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय आणि बॉलिवूडच्या दिग्गजांनी राधिका आणि अनंत यांच्या रोका सोहळ्याला हजेरी लावली होती.

राधिकाने आठ वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे आणि ती श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांची शिष्या आहेत. तिचा पहिला ऑन-स्टेज डान्स परफॉर्मन्स ५ जून रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये पाहायला मिळाला. अंबानींची सून राधिका मर्चंटही प्राण्यांच्या कल्याणासाठी देखील काम करते.

Munmun Dutta Education: जेठालालची क्रश ‘बबीता’ कितवी शिकलीय माहितेय का?

Source link

Ambani familymukesh Ambani daughter in law latest Update Newsradhika AmbaniRadhika Merchant Ambani Biography latestRadhika Merchant Ambani EducationRadhika Merchant DetailsRadhika Merchant EducationShloka Mehta Ambani look latest Update News
Comments (0)
Add Comment