ते माझ्याकडे बघून शिट्टी वाजवतात; महिलेच्या तक्रारीवर कोर्ट म्हणाले, हे काही…

मुंबईः मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महिलेकडे बघून शिट्टी वाजवणे व अश्लील हातवारे करणे यासारख्या लैंगिक स्वरुपाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यासोबतच एक महत्त्वाचं निरीक्षणदेखील नोंदवलं आहे.

महिलेने आरोप केला होती की, सदर आरोपी हे तिचे शेजारी आहेत. अनेकदा ते टेरेसवरुन शिट्टी वाजवणे, घरातील भांडे वाजवून विविध प्रकारचे आवज करणे, सतत गाडीचा हॉर्न वाजवणे यासारखे कृत्य करतात. महिलेच्या या आरोपावर कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. केवळ शिट्टी वाजवल्यामुळं व असा आवाज केल्यामुळं आरोपी दोषी आहे असा अंदाज लावू शकत नाही. आरोपी चुकीच्या हेतूने असे कृत्य केलंय हे सिद्ध होत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

वाचाः वाढदिवशीच तरुणावर ओढावला भयंकर प्रसंग; केक आणायला गेला तो परतलाच नाही

महिलेने SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गंत तिघांविरोधात अर्ज केला होता. यात एका महिलेचाही समावेश होता. त्यावर न्यायमूर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्या खंडपीठाने ५ जानेवारी रोजी दिलेल्या निकालात म्हटलं आहे की, महिलेने दाखल केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तीन आरोपींपैकी कोणीही लैंगिक हेतूने महिलेच्या शरीराला स्पर्श केला होता असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

वाचाः दौंडमधील सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पोलीस तपासात झाला मोठा उलगडा

दरम्यान, कोर्टाने आरोपीला जामीन देतानाच त्यांना कोठडीची आवश्यकता नसून ते अटक झाल्यास त्यांना १५,००० रुपयांच्या जामीनावर सोडण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. तसंच, सर्वांनी तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

वाचाः क्रूड ऑईलचा दर घसरला; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, १L साठी किती पैसे मोजावे लागणार

Source link

aurangabad court newsaurangabad news todaywhistling the house not sexual harassmentऔरंगाबाद आजच्या बातम्याऔरंगाबाद ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment