रिओ वेड्स रिया: अख्या मुंबईत होतेय या लग्नाची चर्चा, पाहा असं खास होत तरी काय

नवी मुंबई: आपण सर्वांनी अनेकदा दोन व्यक्तींमधील विवाह पाहिले आहेत आणि त्या विवाहांमध्ये सहभागी देखील झालो आहोत. पण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच दोन श्वानांचा विवाह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे लग्नात मंगलाष्टका आणि अंतरपाट धरण्याला विशेष महत्त्व असते, अगदी तशाच प्रकारचा विधी श्वानांच्या लग्नातही झाल्याने, या विवाहाची संपूर्ण नवी मुंबईमध्ये चर्चा होत आहे.

विवाह बंधनात दोन व्यक्ती अडकणे ही सामान्य गोष्ट आहे, मात्र दोन श्वानांचा विवाह झाला असं कधीही ऐकण्यात आलं नव्हतं. नवी मुंबईतील सानपाडा विभागामध्ये दोन श्वानांचा विधीवत विवाह संपन्न झाल्याची घटना समोर आली आहे. ह्या दोन श्वानांचा विवाहाचा विषय चर्चेचा ठरत आहे.

वाचा- सिकंदर शेख भीमा केसरीचा मानकरी; हरियाणाच्या भुपेंद्र अजनालाला पराभूत करत गदा

नवी मुंबईतील सानपाडा विभागातील गुणेंना सोसायटी मध्ये दोन श्वानांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. रिओ आणि रिया अशी ह्या दोन श्वानांची नावे आहेत. दोन सर्वसामान्य व्यक्तींचा विवाह जसा परंपरा आणि प्रथेनुसार संपन्न होतो, तशाच प्रकारे हा विवाह संपन्न झाल्यानंतर ह्या श्वानांची वरात देखील काढण्यात आली. त्यामुळे ह्या दोन श्वानांचा विषय चर्चेत आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच ह्या विवाहाला वऱ्हाडासह पाहुण्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.

वाचा-न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी झटका; टीम इंडियासाठी आली वाईट बातमी

लग्नामध्ये जसे मंगलअष्टका, अंतरपाटा सह इतर पद्धतींना महत्त्व असते , तसेच विधी या श्वानांच्या लग्नातही झाले आहे. त्यामुळे ह्या लग्नाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होत आहे.

वाचा-शुभमन गिलने वनडे क्रिकेटच्या इतिहास घडवला; चौथेच शतक ठरले विक्रमी, दिग्गज मागे पडले

दोन श्वानांची लग्न हे सामान्य नव्हते त्यांची मिरवणूक ही मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. मंडपही सजवण्यात आले होते. जेथे पंडितांच्या उपस्थितीत सात फेरे घेऊन आणि एकमेकांना पुष्पहार घालून दोन श्वानांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. दोन्ही श्वानांच्या बाजूची नातेवाईक मंडळी लग्नाचा आनंदा घेत होती.

दोन श्वानांचा विवाह संपन्न झालेले हे लग्न नवी मुंबईतील पहिलेच लग्न असेल. या लग्नाला युवा नेते निशांत भगत उपस्थिती होते, यावेळी त्यांनी सांगितले की, हा विवाह अनोखा नसून समाजासाठी जनजागृतीचा एक भाग असल्याचे सांगितले.

Source link

navi mumbaitwo dogs marriagewedding of two dogsरिओ वेड्स रियाश्वानांचा विधीवत विवाहश्वानांचा विवाह
Comments (0)
Add Comment