खरा ‘बादशाह’! अखेर शाहरुख खानचा ‘पठाण’ रिलीज, चाहत्यांनी अनुभवलं थिएटरचं स्टेडिअम होणं

मुंबई- शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि सर्व विरोधानंतर अखेर २५ जानेवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘पठाण’ चित्रपटाचा जेवढा विरोध झाला तेवढाच उत्साह त्याच्या चाहत्यांनी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दाखवला. ‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केल्याचे सांगितले जात आहे.

शाहरुखच्या चार वर्षांनंतरच्या कमबॅक चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येत असून या सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. ‘पठाण’ने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’चा विक्रम तर मोडलाच शिवाय ‘KGF 2’ला कडवे आव्हानही देताना दिसत आहे. आता ट्विटरवर सिनेमाबाबद लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुख खान आणि त्याच्या ‘पठाण’ सिनेमासाठी चाहते ट्विटरवर काय म्हणत आहेत ते एकदा पाहू.

सिनेमा ७७ हजार स्क्रीन्सवर झाला रिलीज

‘पठाण’ सिनेमा बुधवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून या सिनेमातून बऱ्याच कालावधीनंतर ‘बादशाह’ मोठ्या पडद्यावर त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्वीटनुसार, शाहरुखचा सिनेमा देशभरात ५ हजार २०० स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये आहे. तर परदेशात २ हजार ५०० स्क्रीनवर पठाण दाखवण्यात येणार आहे. एकूणच जगभरात हा सिनेमा ७७ हजार स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे.

ट्विटर रिअॅक्शन-

लोकांनी सिनेमाच्या पहिल्या शोसाठीची असणारी क्रेझही शेअर केली. एका चाहत्याने व्हिडिओ शेअर करत मुंबईतील सकाळी ७ च्या शो ला असलेली गर्दी दाखवली आणि यामुळे बॉयकॉट गँग कोमात गेल्याचं म्हटलं. काही चाहते मॉर्निंग शो पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर झोपले, हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

लोक ही संधी उत्सवाप्रमाणे साजरे करीत आहेत. शाहरुख खानच्या दहार्ड चाहत्यांनी लोकांना विनंती केली आहे की चित्रपटाशी संबंधित कोणताही स्पीलर, कोणतीही प्रतिमा, कोणताही व्हिडिओ सामायिक करू नका.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून आदित्य चोप्रा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. दीपिका पादुकोण शाहरुख खान व्यतिरिक्त जॉन अब्राहमही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या व्यतिरिक्त सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

Source link

pathaan reviewpathaan shah rukh khanpathaan twitter reviewshah rukh khan pathaanshah rukh khan. shah rukh khan pathaanपठाणपठाण रिव्ह्यूशाहरुख खान
Comments (0)
Add Comment