Republic Day: २६ जानेवारी २०२३ रोजी भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. १९५० मध्ये या दिवशी देशात संविधान लागू झाले आणि भारत देश लोकशाही राष्ट्र बनला. भारताच्या स्वातंत्र्यात, देशाला घटनात्मक राष्ट्र बनवण्यात आणि त्याच्या विकासामध्ये आजवर अनेक महापुरुष, स्वातंत्र्य सैनिक, सैनिक आणि हुतात्म्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यानंतर देशाला जागतिक पातळीवर नेणारे राजीव गांधी, अटलबिहारी आणि एपीजे अब्दुल कलाम या सर्वांनी राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिले.
या योगदानासाठी राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने देशभक्तीच्या भावनेला आपण सलाम करतो. शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. जर तुमचे मूलही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असेल, तर त्याला देशभक्तीची भावना वाढवणाऱ्या मजबूत स्वातंत्र्याच्या घोषणांची आठवण करून द्या.

भारत माता की जय – महात्मा गांधी
सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा- इक्बाल
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे – बाळ गंगाधर टिळक
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै है – बिस्मिल अजीमाबादी
इन्कलाब जिंदाबाद – भगतसिंग