पठाण आज प्रदर्शित झाला. त्यामुळं नवीन मराठी चित्रपटांना स्क्रिन्स आणि थिएटर मिळत नसल्याचं समोर आलं आहे. यावर आता अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना मनसे स्टाइल दम दिला आहे.
काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वेड आणि वाळवी या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळं यानंतर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या स्क्रिन्स मिळत नसल्यानं मराठी चित्रपट सृष्टीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मनसेचे अमेय खोपकर यांनी या संदर्भात म्हटलं आहे की, शाहरुख पाच वर्षांनी कमबॅक करतोय, ही मोठी गोष्ट वगैरे असली म्हणून काय त्यासाठी मराठी चित्रपटांचा बळी द्यावा का? असं म्हणत खोपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पठाणला विरोध नाही पण,…
पठाणला विरोध नाही, पण मराठी चित्रपटांना त्यांच्या वाट्याचे स्क्रिन्स आणि थिएटर्स मिळायला हवेत, असंही खोपकर म्हणाले. मल्टीप्लेक्स चालकांनाही हे समजायला हवं, नाही तर आम्ही येऊन ‘बांबू’ लावू असा इशारा खोपकरांनी दिला आहे.