वयाच्या ९ व्या वर्षी मिळाली लता दीदींसोबत गाण्याची संधी, कविता कृष्णमूर्तींबद्दल या खास गोष्टी माहीत नसतील

मुंबई : बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकामध्ये कविता कृष्णमूर्ती (Kavita Krishnamurthy) आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तमिळ कुटुंबामध्ये जन्मलेल्या कविता कृष्णमूर्ती यांनी बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. कविता याचं खरं नाव श्रद्धा कृष्णमूर्ती असं आहे. परंतु त्या कविता कृष्णमूर्ती या नावानं लोकप्रिय झाल्या. कविता यांनी सिनेगाण्यांबरोबरच गजल, पॉप, शास्त्रीय अशा विविध प्रकारची गाणी सहजपणं गायली. कविता यांनी सिनेमांसाठी गायलेल्या गाण्यांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

शाहरुखचा जबरा फॅन! अमरावतीकर चाहत्याने बुक केलं अख्खं थिएटर; रीलिजआधीच ‘पठाण’ची हवा
कविता यांचे वडील शिक्षण विभागामध्ये अधिकारी होते. त्यांचं संगीताचं प्रारंभीचं शिक्षण घरातच घेतलं. आठव्या वर्षी कविता यांनी एका संगीत स्पर्धेमध्ये भाग घेतलं आणि त्यात त्यांना सुवर्ण पदक मिळालं. त्या स्पर्धेनं कविता याचं आयुष्य बदलून गेलं. तेव्हापासून गायिका होण्याचं कविता यांनी स्वप्न पाहिलं. कविता नऊ वर्षाच्या असताना त्यांना लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्याची संधी मिळाली. हे गाणं बंगाली होतं. कविता यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतचं शिक्षण बलराम पुरी यांच्याकडून घेतलं. तर मुंबईतील सेंटझेवियर्स महाविद्यालायतून त्यांनी पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असतानाही कविता यांनी गाण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी मन्ना डे यांनी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांच्या एका जाहिरातीमध्ये गाण्याची संधी दिली.


कविता कृष्णमूर्ती यांना खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती ‘१९४७ ए लव्ह स्टोरी’ सिनेमातील ‘प्यार हुआ चुपके से’ या गाण्यामुळे. या गाण्याला आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं. कविता कृष्णमूर्ती यांना चार वेळा फिल्मफेअरचं चार वेळा सर्वोत्तम गायिका म्हणून पारितोषिक मिळालं आहे. 1942 अ लव्ह स्टोरी, याराना, खामोशी, देवदास या सिनेमांतील गाण्यांसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले होते. २००५ मध्ये कविता यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.

नाचो! नाटू नाटू’ ऑस्करच्या शर्यतीत, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग विभागात मिळालं नामांकन
कविता यांनी १९९९ मध्ये एल सुब्रमण्यम यांच्याशी लग्न केलं. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार या दोघांनी बेंगळुरूमध्ये सुब्रमण्यम अॅकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ही स्वतःची संगीत संस्था सुरू केली आहे. एल सुब्रमण्यम यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुब्रमण्यम यांनी कविता यांच्याशी लग्न केलं.



Source link

kavita krishnamurthy agekavita krishnamurthy and Lata Mangeshkarkavita krishnamurthy birthdaykavita krishnamurthy familykavita krishnamurthy hit songskavita krishnamurthy songsकविता कृष्णमूर्ती कुटुंबकविता कृष्णमूर्ती लोकप्रिय गाणीकविता कृष्णमूर्ती वयकविता कृष्णमूर्ती वाढदिवस
Comments (0)
Add Comment