Ganapati Atharvashirsha: संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष आणि पठणाचे ‘हे’ १० नियम, वाचा

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी “गं” हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.

गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, गणेश जयंतीला ‘या’ वेळेत होणार पूजाविधी

गणपती अथर्वशीर्ष

“ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्माऽसि नित्यं।।१।।
ऋतं वच्मि। सत्यं वच्मि ।।२।।
अव त्वं माम्। अव वक्तारंम्। अव श्रोतारम्। अव दातारम्।
अवधातारम्। अवानूचानमव शिष्यम्। अव पश्चातात्। अव पुरस्तात्।
अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्। अवचोर्ध्वात्तात्। अवाधरात्तात्।
सर्वतो मां पाहि-पाहि समंतात् ।।३।।
त्वं वाङ्मायस्त्वं चिन्मय:। त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसि। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ।।४।।
सर्वं जगदिदं त्वत्तो जयाते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापोन लोनिलो नभ:। त्वं चत्वारि वाक्पदानि ।।५।।
त्वं गुणत्रयातीत:। त्वं अवस्थात्रयातीत:। त्वं देहत्रयातीत: । त्वं कालत्रयातीत: । त्वं मूलाधार स्थितोसि नित्यं। त्वं शक्तित्रयात्मक: । त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्। त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वमिद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रह्मभूर्भुव:स्वरोम् ।।६।।
गणार्दि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्। अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं। तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपम्। गकार: पूर्वरूपम्। अकारो मध्यमरूपम्। अनुस्वारश्चान्त्यरूप्म। बिन्दुरूत्तररूपम्। नाद: संधानम्। संहितासंधि:। सैषा गणेश विद्या। गणकऋषि: निचृद्गायत्री च्छंद:। गणपतिर्देवता। ॐ गं गणपतये नम:।।७।।
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नोदंती: प्रचोदयात।।८।।
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधानु लिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृ‍ते: पुरुषात्परम्।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: ।।९।।
नमो व्रातपतये। नमो गणपतये नम: प्रमथपतये।
नमस्तेऽस्तु लंबोदरा यैकदंताय। विघ्ननाशिने शिवसुताय।
श्रीवरदमूर्तये नमो नम:।।१०।।

अथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे नियम

– उच्चार अगदी स्पष्ट असावे.
– अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
– अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.
– जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा ‘वरदमूर्तये नमः ।’ येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.
– अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.
– अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
– अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
– अथर्वशीर्ष पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
– अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.
– दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
– अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
– अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.
– पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.

Source link

Atharvashirshaganapati atharvashirshaganapati atharvashirsha and significanceganapati atharvashirsha in marathiganesh chaturthi 2022अथर्वशीर्ष पठणाचे १० नियमगणपती अथर्वशीर्षगणेश चतुर्थी २०२२गणेशोत्सव २०२२संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष
Comments (0)
Add Comment