एका कार्यक्रमादरम्यान, तुमच्या शालेय जिवनात तुम्ही कसे होतात? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे देताना नारायण राणे यांनी शालेय जिवनातल्या आठवणींना उजाळा दिला.
शालेय जिवनात मी अभ्यासू होतो. मी सहसा कोणाशी मैत्री करायचो नाही. पण काही मित्र माझ्याशी मैत्री करायचे. कारण परीक्षेवेळी नारायण राणेंच्या बाजुला बसल्यावर फायदा होईल असे त्यांना वाटायचे, अशी एक त्यावेळची आठवण त्यांनी सांगितली.
बाकीच्यांना कठीण जाणारा गणित विषय माझा चांगला होता. शाळेत दहावीला कोरगावकार मॅडम आम्हाला शिक्षिका होत्या. त्या गणिताचा नवा संग्रह माझ्याकडून जाणून घ्यायच्या, अशी एक आठवण नारायण राणे यांनी सांगितली.
कोरगावकर मॅडम मला आदल्या दिवशी घरी बोलवून गणिताचा संग्रह समजावून घ्यायच्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी शाळेत शिकवायच्या, असेही ते पुढे म्हणाले.
नारायण राणे कितवी शिकले?
नारायण राणे यांनी राज्यसभा उमेदवारीवेळी भरलेल्या माहितीनुसार त्यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आहे. नारायण राणे यांनी १९७० मध्ये घाटकोपर शिक्षण प्रसारक मंडळ रत्नशाळेतून अकरावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. याशिवाय नारायण राणे यांच्या शिक्षणाबाबत सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही.
नारायण राणे यांचे शिक्षण कमी असले तरीही त्यांचा अनुभव दांडगा आहे. शिवसेना-भाजप काळात दुसरे मुख्यमंत्री होऊन त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आपल्या आक्रमक शैली आणि रोखठोक भुमिकेमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.