जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्सचे टॉप ३ फ्लिप फोन, किंमत १९११ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः cheapest Flip Phones: देशात मोबाइल फोन यूजर्स मोठ्या वेगाने स्मार्टफोनकडे स्विच करीत आहेत. परंतु, तुम्हाला कमी किंमतीत वेगळ्या डिझाइनचे फोन हवे असतील तर तुम्ही फ्लिप फोन (Flip Phones) ला खरेदी करू शकतात. लावा आणि नोकिया सारख्या ब्रँडला देशात स्वस्त किंमतीत फ्लिप फोन ऑफर करतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे नोकिया, लावा आणि ईझीफोनचे फ्लिप फोन संबंधी सविस्तर जाणून घ्या. हे फ्लिप फोन पॉवरफुल फीचर्स सोबत येतात. जाणून घ्या डिटेल्स.

Lava Flip Phone

लावा फ्लिप फोनला अमेझॉन इंडियावर १९११ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. लावाचा हा फोन ट्रेडिशनल फ्लिप डिझाइन सोबत येतो. यात कीपॅड डिझाइन मिळते. लावा फ्लिप फोन मध्ये ३ दिवसाची बॅटरी बॅक अप मिळते, असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये MTK6261D प्रोसेसर दिला आहे. यात 1200mAh ची बॅटरी दिली आहे. फोनचे स्टोरेजला मायक्रोएसडी कार्ड द्वारे ३२ जीबी पर्यंत वाढवले जावू शकते.

वाचाः भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

Nokia 2660 Flip 4G Volte keypad Phone
नोकियाच्या या फोनला अमेझॉन इंडियावर ४ हजार ६४९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. हा फोन मोठ्या कीपॅड सोबत येतो. यात २.८ इंच प्रायमरी डिस्प्ले दिली आहे. या फोनमध्ये Zoom UI मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा फोन एक सिंपल फ्लिप सोबत येतो. हा फोन ४जी कनेक्टिविटी सोबत येतो.

वाचाः Croma Sale: ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर थेट ७ हजाराचा डिस्काउंट, पाहा ऑफर

Easyfone Royale for Seniors
Easyfone Royale for Seniors या फोनला अमेझॉन इंडियावर ३ हजार ८४० रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. या फोनमध्ये CareTouch सब्सक्रिप्शन दिले आहे. हा फोन यूजरला औषधासाठी रिमाइंड पाठवतो. यात मोठे बटन दिले आहे. हा फोन कीपॅड बॅकलिट सोबत येतो. या फोनमध्ये एक SOS बटन दिले आहे. यातील एका बटनाला प्रेस केल्यानंतर इमरजन्सी कॉन्टॅक्टला ऑटोमॅटिकली कॉल आणि मेसेज जातो. या फोनमध्ये २.४ इंचाची स्क्रीन, फोटो स्पीड डायल, लाउड साउंड, डार्क चार्जरसारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः ग्राहकांची चांदी! Nothing Phone (1) स्मार्टफोन १० हजारांनी झाला स्वस्त

Source link

cheapest Flip PhonesEasyfone Royale for SeniorsFlip PhonesLava Flip PhoneNokia 2660 Flip 4G
Comments (0)
Add Comment