धीरेंद्र महाराजांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट, ते अंधश्रद्धा पसरवत नाहीत, नागपूर पोलिसांची माहिती

नागपूर : मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्र्वर धीरेंद्र कृष्ण महाराज हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.त्यामागील कारण म्हणजे नागपुरातील रेशीमबाग मैदानावर दिव्य दरबार आयोजित करण्यात आला होता. अशातच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष शाम मानव यांनी बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराबाबत आक्षेप घेत धीरेंद्र कृष्ण महाराज यांना थेट आव्हान दिले होते की, दिव्य शक्ती सिद्ध करा आणि ३० लाख रुपये बक्षीस मिळवा. या आव्हान आणि प्रतिआव्हानामुळे बागेश्वर महाराज जोरदार चर्चेत आले होते. श्याम मानव यांनी जे आव्हान दिले होते त्याला महाराष्ट्रातील कायद्याचा देखील आधार होता, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांनी तपासानंतर धीरेंद्र कृष्ण महाराज आक्षेपार्ह कृत्य करत असल्याचं दिसत नसल्याचं म्हटलं आहे. श्याम मानव यांनी यानंतर नागपूर पोलिसांनी काढलेला निष्कर्ष हा त्यांनी काढलेला नसून कसल्यातरी अडचणीतून तो काढण्यात आल्याचं श्याम मानव म्हणाले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी “आम्ही श्याम मानव यांच्या आरोपांबद्दल सखोल तपास केला. त्यासाठी धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या कार्यक्रमाचे सहा तासांपेक्षा जास्त व्हिडिओ फुटेज तपासले. मात्र, धीरेंद्र कृष्ण महाराज कुठलीही अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि त्यांचे कृत्य जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा असल्याचे जाणवत नाही”. त्यामुळे याप्रकरणी नागपूर पोलीस कुठलाही दखलपात्र गुन्हा दाखल करणार नाहीत, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.यासंदर्भात आज अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांना रीतसर माहिती दिली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोलताना सांगितले.

अडीच किलो सोन्याचा पाळणा, फुलांची आरास…पुण्यातील दगडूशेठ मंदिरात गणेश जन्म सोहळा

नागपूर पोलिसांनी सात आणि आठ जानेवारी रोजी झालेल्या दिव्य दरबाराचे सहा तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडिओ फुटेज तपासले असून त्यामध्ये कुठेही धीरेंद्र कृष्ण महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत किंवा लोकांना जादूटोणा किंवा भूत बाधा संदर्भात प्रोत्साहित करत आहे असे जाणवत नाही. त्यामुळे याप्रकरणी कुठलाही दखलपात्र गुन्हा नोंदवता येत नाही, असे पोलीस आयुक्त कुमार म्हणाले. या प्रकरणी धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर अधिकारांसाठी मोकळे असून ते न्यायालयात दाद मागू शकतात असेही पोलीस आयुक्त म्हणाले.

ICC ranking: जगात भारी मोहम्मद सिराज; ICC क्रमवारीत झाला नंबर वन गोलंदाज!

श्याम मानव काय म्हणाले?

श्याम मानव यांनी याला क्लीन चीट म्हणता येणार नाही, असं म्हटलं. पोलिसांनी जे व्हिडिओ पाहिले त्यावरुन त्यांना हा कायदा लागू होत नाही, असं वाटतं. पोलिसांचा काय निर्णय झाला विचारणार होतो पण त्यापूर्वीच त्यांनी भूमिका मांडली. राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन जादूटोणा प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रात संमत झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना पोलिसांचं प्रशिक्षण आयोजन करण्यात आलं होतं. कायद्यानुसार नागपूरमध्ये दिव्य दरबार झाला त्यामुळं, धीरेंद्र महाराज यांच्या वक्तव्यामुळं तो कायदा लागू होतो. या कायद्यान्वये प्रचार प्रसार करणे गुन्हा आहे. महाराजांचे जुने पुरावे आहेत त्यानुसार कायदा लागू होतो, असं श्याम मानव म्हणाले. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तुझं भलं होईल अशा प्रकारचे सल्ले देत असेल तर तो जादूटोणा कायद्याच्या कलम ३/२ प्रमाणं गुन्हा लागू होतो, असं श्याम मानव म्हणाले. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा यामुळं अवमान होत असल्याचं श्याम मानव म्हणाले.

पोलिसांनी स्टार्ट टू एंड हिशेब मांडला! ७ महत्त्वाचे पुरावे, आफताब फाशीपासून वाचणार का?

बाळासाहेबांनाही समाधान वाटत असेल की यंदा माझी मोठी जयंती साजरी होतेय, संदीपान भुमरेंचं विधान

Source link

Amitesh Kumardhirendra maharajnagpur marathi newsNagpur newsNagpur policeshyam manavshyam manav newsधीरेंद्र महाराजनागपूर पोलीसश्याम मानव
Comments (0)
Add Comment