एकीकडे तुफान गर्दी तर दुसरीकडे तीव्र विरोध; ‘पठान’ विरोधात देशातील अनेक शहरात आंदोलन पेटलं

मुंबई- शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आवाज २५ जानेवारी प्रदर्शित झाला आहे. फक्त देशातच नाही तर विदेशातही एखाद्या सणासारखं वातावरण आहे. शाहरुखचे चाहते ‘पठाण’ पाहायला थिएटरमध्ये गर्दी करतायत. कुणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडतायत तर कुणी नाचताना दिसतंय. काही चाहते तर चित्रपट पाहिल्यानंतर भावनिक झालेले देखील पाहायला मिळतायत. एकीकडे असं चित्र असलं तरी दुसरीकडे वेगळीच बाजू समोर येते आहे. ‘पठान’ला बॉयकॉट करणाऱ्यांनी आता देशभरात आंदोलन करायला सुरुवात केली आहे. देशातील वेगवेगळ्या भागात ‘पठाण’ विरोधात निदर्शन होत आहे. काही ठिकाणी तर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. काही ठिकाणी शाहरुखचे पोस्टर फाडले जातायत तर काही ठिकाणी पोस्टरला आग लावण्यात येतेय.

चित्रपटाचा बहिष्कार अजूनही सुरूच
शाहरुख, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर ‘पठान’ आज देशभरातील आणि जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच्या चाहत्यांनी या चित्रपटासाठी सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं आहे. मात्र त्याचबरोबर बॉयकॉट गँगही चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर आली आहे. ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यावर हा विरोध सुरू झाला होता. या चित्रपटातील दीपिकाची भगव्या रंगाची बिकिनी काही नेटकऱ्यांना मुळीच पसंत पडली नव्हती. चित्रपटाच्या विरोधात अनेक संघटना उभ्या राहिल्या आहे. काहींनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली, तर काहींनी चित्रपटात पुन्हा काम करून काही दृश्ये हटवण्याचा सल्ला दिला.

भागलपूर, इंदूर, बेंगळुरूमध्ये विरोध
आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर भागलपूर, इंदूर, बेंगळुरू, बेळगाव यांसारख्या देशातील इतर अनेक शहरांमध्ये चित्रपटाविरोधात प्रचंड गोंधळ सुरू आहे. ‘पठाण’च्या प्रदर्शनाच्या विरोधात या ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. बंगळुरूमध्ये विश्व हिंदू परिषदेने चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि चित्रपटाचे पोस्टरही जाळले.

जॉन अब्राहमच्या भूमिकेवरही आक्षेप
इतकंच नाही तर या चित्रपटातील जॉन अब्राहमच्या भूमिकेवरूनही वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे. जॉनच्या पात्राच्या नावावर पसमांदा कार्यकर्ते फयाज अहमद फैजी यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात खलनायक आणि दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसणाऱ्या जॉनचं नाव पसमंदा चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या नावावर असल्याचा दावा फयाज अहमद यांनी केला आहे.

भागलपूरमध्ये आधीपासूनच सुरू आहे विरोध
भागलपूरमध्ये एक दिवस आधी बुधवारीच या चित्रपटाविरोधात निदर्शने सुरू झाली. एबीवीपी आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी दीपप्रभा सिनेमा हॉलमध्ये लावलेले पोस्टर्स फाडून जाळल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच अखिल भारत हिंदू महासभेने (एबीएचएम) आग्रा येथे शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

Source link

pathan protestprotest against shahrukh khan pathanprotest in agra against shahrukh khan pathanprotest in bengaluru against shahrukh khan pathanprotest in india against shahrukh khan pathanshahrukh khan pathan protest
Comments (0)
Add Comment