प्रजासत्ताक दिनी नातलग आणि मित्रमैत्रीणींना शुभेच्छा पाठविण्यासाठी हे मेसेज येतील उपयोगी, वाचा आणि पाठवा

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वच भारतीय सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यावर्षी भारत आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या दिवशी आपल्या देशात सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले होते. भारताचा स्वातंत्र्यदिन ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव म्हणून तर प्रजासत्ताक दिन संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. यादिवशी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश.

“भारत देश विविध रंगांचा,
विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”

“उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

“गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”

“झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा”

“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा”

“रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
प्रजासत्ताक दिनानिमीत्त शुभेच्छा”

“कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा”

“मोकळ्या आकाशात रंग भरू तीन
जगभर पसरवू रंग त्याग नी शौर्याचा
जगभर पसरवू रंग शांततेचा
जगभर पसरवू रंग समृद्धीचा,
करू नमन आपल्या तिरंग्याला,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Source link

happy republic dayrepublic dayRepublic Day 2023republic day 26 january messagesrepublic day quotes in marathirepublic day status for whatsapp facebookrepublic day wishesप्रजासत्ताक दिनप्रजासत्ताक दिन २०२३प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Comments (0)
Add Comment