वाचा: या Airtel प्लान्समध्ये Disney Plus Hotstar मिळेल मोफत, सोबत रोज 2.5GB पर्यंत डेटा सुद्धा
या अपडेटने ग्रुप अॅडमिनसाठी नवीन शॉर्टकट आणले आहेत, ज्याच्या मदतीने ग्रुप मॅनेज करणे अधिक सोपे होईल. हा शॉर्टकट संपर्काशी संबंधित अनेक पर्याय देईल आणि विविध ऍक्शन्स परफॉर्म करता येतील. अॅडमिन कॉल करण्यापासून ते वैयक्तिक मेसेजिंगपर्यंत सर्व काही करू शकतील.
वाचा: या 5G फोनवर ३१ जानेवारीपर्यंत भन्नाट ऑफर, MRP पेक्षा कमीमध्ये खरेदीची संधी
नवीन WhatsApp शॉर्टकट कसे काम करतील?
WABetaInfo या व्हॉट्सअॅप अपडेट्सची माहिती देणार्या प्लॅटफॉर्मने सांगितले आहे की, आता एखाद्या मेंबरने ग्रुप सोडल्यास त्याचा नंबर हायलाइट केला जाईल. नवीन अपडेटसह, Group Admins ना कॉल करण्यासाठी संपर्काच्या नंबरवर दीर्घकाळ टॅप करणे आवश्यक आहे. याशिवाय, अॅडमिन्स कोणत्याही ग्रुप पार्टिसिपंटसोबत प्रायव्हेट चॅटिंग करू शकतील.
आता ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडणे सोपे झाले आहे
मेसेजिंग अॅपच्या iOS व्हर्जनमधील इतर शॉर्टकटबद्दल सांगायचे तर, कोणत्याही ग्रुप पार्टिसिपंटचा फोन नंबर आता सहजपणे कॉपी केला जाऊ शकतो. याशिवाय, अॅड्रेस बुकमधून नवीन संपर्कांना अॅपचा भाग बनवणे देखील पूर्वीपेक्षा सोपे होईल.
App लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करणे आवश्यक:
केवळ निवडक iOS युजर्स नवीन फीचर वापरू शकतात. यासाठी आयफोन वापरणाऱ्या युजर्सना त्यांचे अॅप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे लागेल. लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीझ केले जाऊ शकते. याशिवाय, लवकरच अॅप मूळ गुणवत्तेत फोटो शेअर करण्याचा पर्यायही देणार आहे.
वाचा: Republic Day Offers : स्मार्ट टीव्हीसह ‘या’ प्रोडक्टसवर मिळणार ४५ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त ऑफ