‘मातोश्री’च्या कारवाईनंतर शिवसेना सोडली, दोन दशकांनी पुन्हा ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन

औरंगाबाद : शिवसेना सोडलेले माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी पुन्हा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. भूखंड प्रकरणात मातोश्रीवरुन झालेल्या कारवाईनंतर सुमारे दोन दशकानंतर सुदाम सोनवणे यांनी पुनर्प्रवेश केला.

राजकारणात पक्षातून कोण-कधी बाहेर पडेल, आणि पुन्हा त्याच पक्षात परत येईल, हे सांगता येत नाही. तीन वेळा शिवसेनेकडून नगरसेवकपद मिळवलं, महापौरपदही भूषवलं, अशी कारकीर्द असलेल्या सुदाम सोनवणे यांनी दोन दशकांपूर्वी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता.

या काळात अनेक पक्ष, संघटनांचा झेंडा हाती घेत त्यांनी राजकारण केले. एका भूखंड प्रकरणावरून त्यांच्यावर मातोश्रीवरून कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला घरघर लागली होती.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी वेळोवेळी शिवसेनेवर टीका केली. आता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला. मंगळवारी सोनवणे यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विश्वनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती

दरम्यान, सोनवणे यांना ठाकरेंनी पक्षात प्रवेश दिल्याने ज्यांनी गेली वीस वर्षे सोनवणे यांच्या विरोधात शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या सिडको भागात काम केले आहे. अशा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत

हेही वाचा : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उभे राहणार का, आमदार होणार का? लक्ष्मण जगतापांच्या भावाचं मोठं वक्तव्य

Source link

aurangabad politicsMaharashtra Political Newsshivsena uddhav balasaheb thackeraysudam sonawaneUddhav Thackerayउद्धव ठाकरेऔरंगाबाद राजकीय बातमीचंद्रकांत खैरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसुदाम सोनावणे
Comments (0)
Add Comment