‘वेड’साठी जेवढं…स्क्रिन आणि प्राइम टाइमच्या वादावर स्पष्टच बोलली ईशा केसकर

मुंबई: सध्या अनेक बॉलिवूड तसंच मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती होत असली तरी, या चित्रपटांना सिनेमागृह-मल्टिप्लेक्समध्ये जागा नसल्याचं वास्तवही मान्य करावं लागत आहे. प्राइम टाइमच्या वादात सिनेमागृह-मल्टिप्लेक्सवर हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना नेहमीच दुय्यम स्थान मिळ्याचं दिसून आलं. आज मराठी चित्रपट बॉलिवूडला चांगली टक्कर देताना दिसतोय. पण आता झालं असंय की, बॉलिवूडच्या किंग खानच्या पठाण चित्रपटासाठी इतर मराठी चित्रपटांचे शो कमी केले जात आहेत. अनेक ठिकणी तर रद्दही करण्यात आलेत. यामुळं मराठी कलाकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘वेड’, ‘वाळवी’, ‘सरला एक कोटी’, ‘व्हिक्टोरिया’ बॉक्स ऑफिसवर सरस ठरले. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळं त्याचा या चित्रपटांच्या शोवर परिणाम झाला आहे. यावर बोलताना अभिनेत्री ईशा केसकरनं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

ईशानं इन्स्टग्रावर लाइव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. तसंच त्यांच्या प्रश्नांची उत्तरही दिली. प्राइम टाइम मिळत नाहीये, यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न एका चाहत्यानं विचारला होता. यावर ईशानं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. तिनं काही चुका मान्य करत हे का घडलं किंवा घडतंय यावर भाष्य केलं.


काय म्हणाली ईशा?

शेवटी एका हातानं टाळी वाजत नाही. प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला आमच्याकडूनही थोडा उशीर झाला. आत्ता जो वेड चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटासाठी ज्या पातळीवर प्रमोशन करण्यात आलं, तेवढं आम्ही नाही करू शकलो. त्यामुळं आम्ही मागे पडलो. त्यामुळं आम्हाला स्क्रिन्स दिल्या नाहीत. पण तुम्ही चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू की, चित्रपटाला जास्तीत जास्त स्क्रिन्स मिळाव्यात. आमच्यासोबत बरेच चित्रपट आहेत. स्पर्धाही खूप आहे. तरीही आमचे निर्माते, दिग्दर्शक प्रयत्न करतायत’, असं ईशानं म्हटलं आहे.


दरम्यान, ईशासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून ओंकार आणि ईशा यांच्या भूमिकांचंsarla ek koti कौतुक होत आहे.



Source link

isha keskaronkar bhojanesarla ek kotisarla ek koti castsarla ek koti moviesarla ek koti showssarla ek koti shows in mumbaiईशा केसकरओंकार भोजने
Comments (0)
Add Comment