Success Story: आई करते मोलकरीणीचं काम तर वडील शिपाई, मुलीला मिळाले २० लाखांचे पॅकेज

Ritika Surin Success Story: मनात हिंमत असेल तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडतो. जगातील सर्व समस्या एका बाजूला आहेत आणि गरिबी दुसऱ्या बाजूला असे काहीजण म्हणतात. अशात परिस्थितीवर हिंमतीच्या जोरावर मात करणाऱ्या रितिका सुरीनची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

रितिका सुरीनच्या आईचे नाव मेरी असून ती घरकाम करते.तर वडीलांचे नाव नवल गलगोटिया असून ते एका कॉलेजमध्ये शिपाई आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणती कसर सोडली नाही. दरम्यान नुकत्याच लागलेल्या निकालानंतर रितिकाला वीस लाख रुपयांचे पॅकेज मिळाले.

झारखंडची रहिवासी असलेली रितिका सुरीन ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी रितिका हिला ऑटोडेस्क या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीने २० लाखांचे पॅकेज दिले आहे. गरिबीत वाढलेल्या रितिकाच्या या यशावर तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत.

रितिका म्हणाली, ‘माझी आई लोकांच्या घरात साफसफाईचे काम करते. तर वडील नवल हे गलगोटिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करतात. मी नेहमी दोघांना लोकांच्या घरी काम करताना पाहायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. माझे आई आणि वडील फक्त मला शिकवण्यासाठी लोकांचे ऐकतात.’

रितिका पुढे म्हणाली, “एक दिवस मी स्वतःला वचन दिले होते. एक दिवस मी माझ्या वडिलांचे आणि आईचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन. आज मला एका मोठ्या सॉफ्टवेअर Autodesk कंपनीत नोकरी मिळाली. २० लाखांच्या प्लेसमेंटने माझ्या आई आणि वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला, ज्याची मी वाट पाहत होतो. सर्वत्र लोक माझ्या कुटुंबाचे अभिनंदन करत आहेत. माझ्या आई बाबांचे सर्वत्र कौतुक होत असल्याचा मला आनंद असल्याचे ती सांगते.

Success Story: टपरीवर चहा विकणारा बनला IAS अधिकारी, हिमांशूच्या संघर्षाची कहाणी तरुणांना देईल प्रेरणा

पहिल्याच प्रयत्नात २० लाख रुपयांचे पॅकेज

सीईओ ध्रुव गलगोटिया म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी प्लेसमेंटसाठी कॉलेजमध्ये आली होती. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्लेसमेंटमध्ये रितिकाला पहिल्याच वळणातच प्लेसमेंट मिळाले. रितिकाला २० लाखांचे पॅकेज मिळाले आहे.

ध्रुव गलगोटिया पुढे म्हणाले, ‘रितिकाचे आई आणि वडीलही यश मिळाल्याने आनंदी आहेत. विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांसाठीही रितिका एक उदाहरण बनली आहे. रितिकाला प्लेसमेंटमध्ये चांगले गुण मिळाले. रितिकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने तिला ५०% शिष्यवृत्ती दिली. यासोबतच अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत देण्यात आली.

Success Story: ‘कलेक्टर आहेस का?’ या एका टोमण्याने बदलले आयुष्य, प्रियांका शुक्ला अशी बनली IAS
Success Story:अपयशी ठरली पण हार नाही मानली, शेतकऱ्याची मुलगी बनली IAS अधिकारी

Source link

Career Newseducation newsfather works as PeonjharkhandMBAMother works as a maidnoidapeon fatherRitika SurinRitika Surin Success Storysuccess storyआई करते मोलकरीणीचं कामरितीका सुरिन सक्सेस स्टोरीरितीका सुरीनवडील कॉलेजमध्ये शिपाई
Comments (0)
Add Comment