Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
साई दर्शनासाठी अक्षय कुमार शिर्डीत, अचानक समोरच पडला चाहता; अभिनेत्याने काय केलं पाहा - TEJPOLICETIMES

साई दर्शनासाठी अक्षय कुमार शिर्डीत, अचानक समोरच पडला चाहता; अभिनेत्याने काय केलं पाहा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे चित्रपट चाहत्यांवर मोहिनी घालणारे ठरतात. दरम्यान याशिवाय तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी संपर्कात असतो. आता अभिनेत्याचे काही फोटो समोर आले आहेत आणि तेही थेट साईबाबांच्या शिर्डीतून! अक्षयने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईभक्‍त असलेला अक्षय अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो.

दरम्यान आज अक्षयने साईबाबांची पाद्यपुजा करत मनोभावे दर्शन घेतले. यावेळीही त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झालेली. त्याने गाडीतून उतरून चाहत्यांना अभिवादनही केले. यादरम्यान घडलेला एक प्रसंग विशेष चर्चेत आला आहे. अभिनेत्याशी हस्तांदोलन करताना एक भाविक गर्दीत खाली पडला. अक्षयला हात मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना तो खाली पडला. त्याच्या मदतीला स्वत: अक्षय कुमार धावून गेला. अक्षयने या भाविकाला स्वत: उठण्यास मदत केली आणि त्याची विचारपूस केली. अक्षयच्या या कृतीनंतर उपस्थितांकडून अभिनेत्याचे कौतुक होत होते.


हे वाचा-तब्बूने खुलेआम केलं अजय देवगणला किस, ‘भोला’च्या टीझर लाँचवेळी काय घडलं?

अक्षय आज शिर्डीत पोहोचलेला असताना त्याला पाहण्यासाठी साई मंदिरातील भाविकांनी आणि अभिनेत्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली. त्याचवेळी हा प्रकार घडला. तो साईदर्शन घेऊन बाहेर पडत असतात गर्दीत अक्षयचा एक चाहता खाली पडला, त्यावेळी अक्षयने त्याला स्वतः हात देऊन उठवले. अक्षयने त्याची विचारपूस करत काळजी घेणाऱ्याचाही सल्ला दिला.


दरम्यान साईदर्शनासाठी आलेल्या अक्षयचे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन स्वागत केले. अक्षयचे शिर्डीतील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरत इम्रान हाश्मीसोबत ‘सेल्फी’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात इम्रान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून अक्षयची भूमिका सुपरस्टार विजयची आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय की इम्रान आणि त्याचा मुलगा सुपरस्टार विजयचे मोठे फॅन असतात, त्यांना त्याच्यासोबत एक सेल्फी हवा असतो. मात्र सुपरस्टार आणि त्याच्या या जबरा फॅनमध्ये मोठा वाद होतो. आता नेमकं हे भांडण कुठवर जातं हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच लक्षात येईल.

हे वाचा-घोषणाबाजी अन् ‘पठाण’चं पोस्टर फाडलं! धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा सिनेमाला विरोध

अक्षयसाठी २०२२ हे वर्ष म्हणावं तसं चांगलं ठरलं नाही. त्यामुळे सेल्फी सिनेमाकडून अक्षयला आणि त्याच्या चाहत्यांना विशेष अपेक्षा आहेत. पुढील महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय.



Source link

akshay kumar at shirdiakshay kumar at shirdi videoAkshay Kumar At Shirdi Video Viralakshay kumar helped his fanakshay kumar with his fanअक्षय कुमारअक्षय कुमारने घेतले साईबाबांचे दर्शन
Comments (0)
Add Comment