WhatsApp फोटो आणि व्हिडिओंनी फुल झालेले स्टोरेज असे करा फ्री

नवी दिल्ली:WhatsApp Users: WhatsApp हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. कोट्यवधी लोक दररोज व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांना मेसेज पाठवतात आणि संपर्कात राहतात. व्हॉट्सअॅपचा वापर बहुतेक लोक फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे पाठवण्यासाठी करतात. या मल्टीमीडिया फाईल्समुळे अनेकांच्या फोनचे स्टोरेज संपून जाते आणि युजर्सना टेंशन येते. पण, आता काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही करून फोनचे स्टोरेज मोकळे करू शकता. जाणून घेऊया.

वाचा: Airtel चे धमाकेदार प्लान्स, हॉटस्टारसह भरपूर डेटा आणि मोफत कॉलिंग, किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी

WhatsApp सहसा फोनच्या गॅलरीमध्ये फोटो किंवा व्हिडिओ बाय डीफॉल्ट सेव्ह करते. अशा परिस्थितीत फोनचे स्टोरेज खूप लवकर संपते. स्टोरेज मोकळे करण्याचा पहिला मार्ग म्हणजे निवडकपणे फोटो आणि व्हिडिओ हटवणे. परंतु, यात बराच वेळ वाया जातो. अशात मीडिया फाइल्स तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऑटो मीडिया डाउनलोड बंद करणे. यात तुम्ही डाउनलोड केलेला फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड केला जाईल. तुम्ही सर्व चॅटसाठी ऑटो मीडिया डाउनलोड बंद करू शकता. जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया.

वाचा: WhatsApp चे हे फीचर माहितेय का? कोणत्याही भाषेत पाठवता येतो मेसेज, पाहा ट्रिक्स

व्हॉट्स अॅप उघडा. आता टॉपवर दिसणार्‍या तीन डॉट्सवर क्लिक करा. आता Settings वर जा. नंतर चॅट्सवर क्लिक करा आणि मीडिया व्हिजिबिलिटी निवडा. आता मीडिया व्हिजिबिलिटी बंद करा. ही सेटिंग Android फोनसाठी आहे.

तुमच्याकडे आयफोन असल्यास, व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जा आणि सेव्ह टू कॅमेरा रोल बंद करा. तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीने किंवा ग्रुपने पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड करायचे नसतील तर, व्हॉट्सअॅप उघडा आणि त्या चॅटवर जा. आता View Contact/Group Info वर क्लिक करा. यानंतर मीडिया व्हिजिबिलिटी बंद करा.

वाचा: Republic Day Offers : स्मार्ट टीव्हीसह ‘या’ प्रोडक्टसवर मिळणार ४५ टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त ऑफ

Source link

WhatsApp chatsWhatsApp dataWhatsApp featuresWhatsApp photoWhatsApp users
Comments (0)
Add Comment