४५ हजारांचा मोबाइल हरवला, पोलीस अधीक्षकांच्या एका कॉलनं काम फत्ते, फोन बारामतीत पोहोचला

पुणे: मोबाइल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा चोरलेले मोबाइल मिळवण्यासाठी सहसा कुणी प्रयत्न देखील करताना पाहायला मिळत नाही. पोलिसात तक्रार देऊनही तो मिळत नाही. अशा अनेक गोष्टी यामागे असतात. मात्र, बारामतीत एक अनोखी घटना समोर आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या एका आयडियामुळे नागरिकाला त्याला मोबाइल थेट कुरिअरने मिळाला आहे.

बारामती येथील न्यायालयात काम करणारे आकाश संजय खंदारे यांचा मोबाईल १४ नोव्हेंबर २०२२ रोजी चोरी झाला होता. पोलीस तपासात हा मोबाइल तामिळनाडू मध्ये ऍक्टिव्हेट असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे तामिळनाडूला जाणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आयडियाप्रमाणे सरळ त्या मोबाइल धारकाला फोन केला व त्याला सांगितले की, या मोबाइल बाबत तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनला आहे. आपण तो मोबाइल तात्काळ पाठवून द्यावा, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यानंतर थेट मोबाइल कुरियरने बारामती पोलीस स्टेशनला मिळाला. त्या मोबाइलची किंमत ४५ हजार रुपये इतकी आहे.

लोकांचे हे हरवलेले मोबाइल चोरी गेलेले मोबाइल शोधून देण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी अग्रक्रम दिलेला आहे. सन २०२२ मध्ये जे मोबाइल चोरी गेलेले आहेत ते वेळोवेळी परत तांत्रिक तपास करून शोधण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत. त्याबाबत सायबर सेल पुणे ग्रामीण यांची मदत घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. जे मोबाइल ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत त्याबाबतची माहिती सर्व पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत कळवली जाते.

बाबा, मी स्कूटीसह दरीत पडलोय, मुंबई-पुणे महामार्गावर काळोख्या रात्रीचा थरार, अखेर…

अनेक मोबाइल सध्या कुठे कार्यरत आहेत हे पोलीस स्टेशनला समजते.परंतु पोलीस खात्यात पोलीस स्टेशनला इतर कामे असल्यामुळे जर मोबाइल परराज्यात मिळून आला तर प्रवास लांबचा असल्याने त्या ठिकाणी पोलीस पोहोचत नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी काहीच तपास न करण्यापेक्षा हा मोबाइल ज्यांच्या ताब्यात आहे. त्यांना सरळ फोन करा कदाचित ते चोर नसतीलही त्यांना कोणीतरी तो मोबाइल दिला असेल आणि त्यांना जर सांगितलं की याबाबत पुणे ग्रामीण या ठिकाणी तक्रार दाखल आहे.कदाचित ते लोक मोबाइल परत पाठवून देऊ शकतात.

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला मोदींशी होणार भेट, ही चिमुकली करणार पंतप्रधानांसह डिनर

तो फोन दुसरा कोणाकडून तरी विकत घेतलेला होता. त्याने सरळ कुरिअर मध्ये जाऊन फोन बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पत्त्यावर पाठवून दिला. आज मोबाइल पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तो तक्रारदाराला दिला.आपला मोबाइल पाहून तक्रारदाराला अतिशय आनंद झाला कारण त्याचा मोबाइल ४५ हजार रुपये किमतीचा होता. त्याने संपूर्ण पोलीस दलाचे आभार मानले.

मुरलीधर जाधवांची गोकुळ संचालकपदी नियुक्ती कायम; ठाकरे गटाला हायकोर्टाचा दिलासा

बायकोसोबत भांडण, तरूण थेट टाकीवर चढला; ७ तास बसला; पोलीस आणि अग्निशमन दलाच्या नाकी नऊ

Source link

baramati newsBaramati Policecyber crimemaharashtra police newsPune Policepune police newspune police news todayपुणे क्राइम न्यूजपुणे ताज्या बातम्या
Comments (0)
Add Comment