कार सनरुफमधून डोकवताना मांजाने गळा चिरला, मुंबईकर चिमुरड्याने आईच्या मांडीवर प्राण सोडले

पालघर : कारच्या सनरूफमध्ये उभं राहून आनंद लुटणाऱ्या चिमुरड्याचा पतंगाच्या मांजाने घात केला. पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे आठ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. दिशान तिवारी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

मुंबईतील कांदिवली येथे राहणारा आठ वर्षांचा चिमुकला दिशान आपले आई-वडील, बहीण, आजी-आजोबा यांच्यासोबत पालघर जिल्ह्यातील हमरापुर- गलतरे येथे फिरण्यासाठी आला होता. कारमधून फिरत असताना दिशान कारच्या सन रुफमध्ये उभा राहून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पहात होता.

त्याच दरम्यान परिसरात उडत असलेला एक पतंग अचानक हवेतून खाली आला. याचवेळी सन रुफमध्ये उभा राहून निसर्ग सौंदर्य पाहत असलेल्या दिशानच्या गळ्यात पतंगाचा नायलॉन मांजा अडकला. कार देखील वेगाने असल्याने त्याचा गळा चिरला गेला व दिशान याला मोठी जखम होऊन रक्तस्राव होऊ लागला.

हेही वाचा : गर्लफ्रेण्डचा नाद लय वाईट! १९ वर्षीय प्रियकराने १३ टू्व्हीलर चोरल्या, डोंबिवलीत अटक

जखमी झालेल्या दिशानला लगेचच मनोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीररित्या जखमी झालेल्या दिशानला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येत असताना अर्ध्या रस्त्यात आईच्या मांडीवरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नायलॉन मांजावर बंदी असताना देखील नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची बाब देखील या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे.

हेही वाचा : सोलापूरच्या तरुणांचा आंध्रात भीषण अपघात, तिरुपती दर्शनाहून परतताना काळाचा घाला, चौघं ठार

Source link

kandivali boy manja deathkite nylon manja slits throatmaharashtra accident news todaymumbai boy kite manja deathnylon manja virar palghar deathनायलॉन मांजा बळीपतंग नायलॉन मांजा मृत्यूमुंबई कांदिवली चिमुकला मृत्यूविरार पालघर चिमुकला मृत्यू
Comments (0)
Add Comment