टाटा मॅजिक आणि एर्टिगाची धडक, अख्खं कुटुंब मृत्यूच्या दाढेतून बालंबाल बचावले…

बुलडाणा: घरुन प्रवासाला निघाल्यानंतर प्रवासादरम्यान काय मांडून ठेवले आहे, हे सांगणं कठीणच आहे. दर दिवसाला रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवास करणे अवघडच झाले आहे. मुख्यतः अनियंत्रित वाहनांचा वेग याला एक मुख्य कारण मानायला हरकत नाही. सध्या समृद्धी सारख्या रस्ते, तसेच अनेक शहरालगतचे अंतर्गत रस्ते देखील गुळगुळीत झाल्याने वाहन चालकांना गतीचा मोह आवरत नाही आणि नेमका तिथेच घात होतो. असंच काहीसं एका घरगुती कार्यक्रमानंतर आनंदाच्या गप्पाटप्पा करत निघालेलं एक कुटुंब थोडक्यात बचावलं आणि आपण म्हणू शकतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नेमका सविस्तर अपघात काय कुठे कसा जाणून घेऊया.

झाले असे की, घरगुती कार्यक्रम आटपून आपापल्या गावाकडे परतणाऱ्या दोन वाहनांचा अपघात होऊन २० जण जखमी झाले. ही घटना आज पिंपळगाव सराई नजीकच्या भारज चौफुलीवर घडली. बुलडाणा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष अशोक गव्हाणे यांच्या परिवारातील सदस्य भारज येथून आपल्या गावी शिरपूरकडे एर्टिगा कारने घराकडे परत जात होते. परंतु, बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथून जवळ असलेल्या भारज चौफुलीवर त्याच्या मालवाहू टाटा मॅजिक आणि एर्टिगाची समोरासमोर धडक झाली.

हेही वाचा -वारंवार पत्नीचा गर्भपात, मग डॉक्टर दाम्पत्याचा भलताच कारनामा; सहा वर्षांनी कृत्य उघड…

यात दोन्ही वाहनातील जवळपास २० जण जखमी झाले. टाटा मॅजिकमधील १४ जण हिसोडा येथून आपल्या गावी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांग्री नवघरेकडे परत जात होते. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून अपघातातील जखमींना बुलडाणा तर काहींना चिखली येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती रायपूर पोलिसांनी मिळाली. नशीब बलवत्तर असल्याने या अपघातात संपूर्ण कुटुंब बचावलं आहे.

हेही वाचा -मंदिरात गेले, शिवलिंगावर फुलं वाहिली, नमस्कार केला, अन् मग… औरंगाबादच्या चोरांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद

Source link

buldhana accidentbuldhana family survived from accidentbuldhana newsroad accident in indianroad accident ratioterrifying accident in buldhanaबुलडाणा अपघातबुलडाणा न्यूज
Comments (0)
Add Comment