डॉ. कल्पना यांनी किचकट समजल्या जाणाऱ्या ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ विषयात मौलिक संशोधन करत ‘पीएच.डी.’ मिळवली. पिकांवर येणाऱ्या पांढरी माशी अर्थातच मिलीबगवरील त्यांचं संशोधन सध्या ‘पेटंट’च्या उंबरठ्यावर आहे. त्याशिवाय कल्पना या अकोला शहरातील ‘आरएलटी’ महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचं कामही करतात. हे सारं करत असतानाच ‘युपीएससी’चाही अभ्यास करतात. यातूनच गावाच्या विकासासाठी थेट गावाच्या राजकारणात उतरण्याची उमेद त्यांच्या मनात निर्माण झाली. २०२१ मध्ये फेब्रुवारीला झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत कल्पना यांची बिनविरोध निवड झाली असून आता गेल्या दोन वर्षापासून त्या गावाच्या सरपंच आहेत.
राजकारणातील प्रवेशाच्या निर्णयाला घरातून प्रचंड विरोध पण
हिंगणी बुद्रुक गटग्रामपंचायतीमधील गणोरी हे कल्पाना यांचं गाव. या गटग्रामपंचायतीत हिंगणीसह खानापूर आणि गणोरी या तीन गावांचा समावेश आहे. सात सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीतील तिन्ही गावांची लोकसंख्या अडीच हजारांच्या जवळपास आहे. यातील पाच महिला तर दोन पुरुष ग्रामपंचायत सदस्य आहेत. उच्चशिक्षित कल्पनाच्या राजकारण प्रवेशाच्या निर्णयाला घरूनच प्रचंड विरोध झाला. तरीही कल्पना यांनी घरच्यांचं मन वळवलं. गावातील राजकारणात काम करण्याचा निर्णय घेतला आणि थेट सरपंच बनल्या. मात्र, लेकीचं आताचं यश आणि चिकाटी पाहून आई-वडिलांना आनंदी आहेत.
गावकऱ्यांना उच्चशिक्षित कल्पना यांच्याकडून अपेक्षा
सरपंचपदी निवड झाल्यानंतर डॉ. कल्पना यांनी तिन्ही गावातील रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न हाती घेतला. अन् गेल्या दोन वर्षात त्यांनी गावातील ८० टक्के रस्त्याचा तसेच सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. सोबतच तीन आंतरराष्ट्रीय आणि पाच राष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध सादर करणाऱ्या डॉ. कल्पना यांना गावांत सुसज्ज ग्रंथालय उभारायचं आहे. आता गावकऱ्यांनाही या आपल्या शिकलेल्या सरपंचांकडून प्रचंड अपेक्षा आहेत.
पूर्ण गावकऱ्यांचा जीवन विमा करण्याचा संकल्प
कल्पना यांनी हिंगणी बुद्रुकसह खानापूर आणि गणोरी गावातील गावकऱ्यांचा जीवन विमा करण्याचा संकल्प घेतला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, कमीत कमी पैशांमध्ये सर्व गावकऱ्यांचा जीवन विमा व्हावा असा त्यांचा मानस आहे. कारण गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, शेतात काम करताना जंगली प्राण्यांमुळे होणारी दुखापत किंवा कुणाचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हातभार मिळावा, यासाठी ही त्यांचा सतत प्रयत्न असतो.
गावात सतत आरोग्य शिबिरांचं आयोजन
आपल्या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तिन्ही गावातील गावकऱ्यांचं आरोग्य निरोगी राहो यासाठी सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आरोग्य शिबीर तसेच तपासणी शिबिरे राबवण्याचा प्रयत्न कल्पना यांचा असतो. सरकारी रुग्णालय असो की खासगी डॉक्टर असो त्यांच्याकडून मार्फत गावात शिबिरांचा आयोजन केलं जातं. गावातील महिलांना शासकीय योजनेतून पुरेपूर रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी कल्पना पळसपगार यांचा सतत पाठपुरावा असतो. तसेच शासकीय योजनांचा खऱ्याखुऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठीही त्यांची धावपळ सुरू असते. या सर्व योजनांचा कारभार हा पारदर्शक व्हावा, असा त्यांचा प्रयत्न असतो.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आणण्याचा प्रयत्न
हिंगणी बुद्रुक परिसर हा मोठ्या प्रमाणात खारपणपट्ट्यात येतो. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पारंपरिक पद्धतीने पिके घेतात, ज्यामध्ये कापूस, तूर आणि सोयाबीन सारखे पिकांतून त्यातही हवं तसं उत्पन्न त्यांना मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतातून मोठा फायदा व्हावा, यासाठी गावातील काही भागात शेततळे तसेच तलाव उभरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून शेतकऱ्यांना ओलिताखालील पिके घेता येतील. लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल असं कल्पना पळसपगार सांगतात.
मंडपात नवरदेवाला नोटाही मोजता येईनात, वधूच्या निर्णयाने वऱ्हाडीही चपापले
गावातील करोना लसीकरण पूर्ण
करोना काळात गावात वेळोवेळी फवारणी, तसेच डासांसाठी फवारणी केली गेली. करोना लसीकरण ही संपूर्ण गावकऱ्यांचं करून घेण्यात आलं आहे. त्याशिवाय गावातील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. तसेच जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागातील दुधाळ जनावरे योजने अंतर्गत गरजू लाभर्थ्यांना लाभ दिला. घरकुल योजनेचाही लाभही अनेकांना दिला आहे.
विवाहाच्या तोंडावर लग्नघराला आग, बस्ता पेटला, लाखोंची रोकड भस्मसात, स्वप्नांची राख
गावातील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाईल, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे कल्पना सांगतात. राजकारण चांगल्या लोकांसाठीचं क्षेत्र नसल्याचं म्हणत शिकलेली लोकं यात येण्यास नाकं मुरडतात. मात्र, समस्यांच्या नावानं शंखनाद करण्यापेक्षा डॉ. कल्पना यांनी स्वत:च याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात येऊ पाहणाऱ्यांसाठी डॉ. कल्पना यांचा हा निर्णय नक्कीच दिपस्तंभासारखा म्हणता येणार आहे.
सत्यजीत तांबेंच्या समर्थनार्थ पहिला राजीनामा, काँग्रेसमध्ये ठिणगी पडली, वणवा पेटणार?
ट्विट करुन मतदारांशी डील करण्याचा सत्यजीत तांबेंकडून प्रयत्न सुरू, शुभांगी पाटलांचा आरोप