कर्मवीर दादासाहेब इदाते यांनी वंचित, पीडित, दलित, भटके विमुक्त यांच्यासाठी मोठे कार्य केले. कर्मवीर दादांनी भारतातील जो जो वंचित आहे, त्याला त्याला आपल्या पायावर उभं केलं. त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नंदादीप पेटवला. जिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही फक्त अशा अतिशय दुर्गम ठिकाणीच शिक्षण संस्था उभारल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षणाची सोयच नव्हती, तेथे दादासाहेबांनी माध्यमिक शाळा चालू केली. तसेच कुंबळे येथे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले.
क्लिक करा आणि वाचा- झाकीर हुसेन, मुलायमसिंग यादव, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्कार… वाचा संपूर्ण यादी
दादासाहेब १९७५ च्या आणीबाणी मध्ये दीड वर्ष येरवडा कारागृहात “मिसा” खाली स्थानबद्ध होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दलची त्यांची तळमळ आणि त्यातूनच त्यांनी भटक्या विमुक्त समाजासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये संघाच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांबद्द्लचीय जाण विकसित व्हावी यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.
संघाचे प्रांत कार्यवाह असताना महाराष्ट्रात समरसता विषय रुजविण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी केले. त्याच दरम्यान मंडल आयोग, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, रिडल्स बाद, आरक्षण असे सामाजिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील विषयांवर रोखठोक भूमिका घेतल्या, पत्रक रूपाने मांडल्या आणि जाहीर भाषणातूनही मांडल्या. अशा रीतीने महाराष्ट्रातील बहुजन समाज संघ विचाराशी जोडण्याचे अमूल्य कार्य त्यांनी केले.
क्लिक करा आणि वाचा- सद्गुरू वामनराव पै याच्या पत्नी शारदामाई पै यांचे निधन, वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रमेश पतंगे यांचाही सन्मान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळ साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून काम पाहिले आहे.या बरोबरच ते हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक् देखील आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे देखील ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
रमेश पतंगे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेले संघर्ष महामानवाचा हे पुस्तक लोकप्रिय झाले होते.
क्लिक करा आणि वाचा- माझा भाऊ जगला पाहिजे म्हणून… भावासाठी बहिणीने केलेल्या या महादानाची कहाणी आणेल डोळ्यात पाणी