एका शिक्षकासाठी विद्यार्थी आले रस्त्यावर; घोषणांनी गाव दणाणले, घातला घेराव, काय आहे कारण?

जालना : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेतील शिक्षक राजू छल्लारे यांची अचानक बदली करण्यात आली. हा नियमांचा एक भाग असला तरी देखील ही बदली शाळेतील विद्यार्थ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. विद्यार्थीप्रिय शिक्षक छल्लारे यांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज आंदोलनच छेडले जणू. ‘रद्द करा रद्द करा, छल्लारे सरांची बदली रद्द करा’, अशा घोषणांनी गाव दणाणून सोडले.

शिक्षक राजू छल्लारे यांची बदली आदेश प्राप्त झाल्याचे माहिती होताच विद्यार्थी भावुक झाले. विद्यार्थिप्रिय असलेले छल्लारे सर म्हणजे विद्यार्थ्यांचे साने गुरुजीच जणू. त्यांचे विद्यार्थ्यांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांची शिक्षणाची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. शाळेत विविध उपक्रम राबवत, नवनव्या संकल्पना राबवत त्यांनी मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवले. त्यांच्या नवनव्या संकल्पनांमुळे विद्यार्थ्यांचे शाळेशी नाते घट्ट झाले. सरांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद हा नुसता पुस्तकापुरता मर्यादित नव्हता, तर आपुलकी, जिव्हाळा जपणारा होता. विद्यार्थ्यांची कौटुंबिक विचारपूस, प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना माहीत होती. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांची पार्श्वभूमी त्यांच्या डोळ्यासमोर असायची. त्यांचा इंग्रजी हा विषय असताना सुद्धा मुलांमध्ये एकाग्रता राहायची. या मुळेच मुलांना इंग्रजीमध्ये गोडी निर्माण होत होती.

क्लिक करा आणि वाचा- ते प्राचार्य एकट्या महिला प्राध्यापिकेला बोलायचे आणि अश्लील…; बांगर यांनी कथित संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली

विद्यार्थ्यांनी गावात काढली फेरी

आमची शाळा एकदम छान चालते आहे. सरांमुळे विद्यार्थ्यांना शिस्त आणि अभ्यासाची गोडी लागली आहे. त्यामुळे सर जाणार या कल्पनेने मुले हादरली असून सरांची बदली रद्द व्हावी, यासाठी आज सकाळीच विद्यार्थ्यांनी गावात फेरी काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

अचानक झालेल्या बदलीने आक्रमक झालेले विद्यार्थी पाहून गावातील थोरा मोठ्यांमध्येही यामुळे आश्चर्याचे वातावरण तयार झाले आहे. या विद्यार्थी प्रेमापुढे संस्थेकडून बदली रद्द होते का? हे येणारा काळ ठरवेलच. पण, विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले शिक्षक पुन्हा तयार होताहेत ही यातली जमेची बाजू.

क्लिक करा आणि वाचा- माझा भाऊ जगला पाहिजे म्हणून… भावासाठी बहिणीने केलेल्या या महादानाची कहाणी आणेल डोळ्यात पाणी

बदली रद्द न झाल्यास पालक व विद्यार्थ्यांनी २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शाळेचे मुख्याध्यापक व पोलिसांना दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी विद्यार्थी परिषद अशा अनेक सामाजिक पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ५ वर्षांची चिमुकली घराजवळ खेळत होती, काही कळण्याच्या आत हिंस्त्र प्राण्याने तिला ओढत नेले, घडला मोठा अनर्थ

Source link

Agitation for teacherjalna newsRaju chhillareजालनाविद्यार्थ्यांनी केले आंदोलनशिक्षक राजू छिल्लारे
Comments (0)
Add Comment