कोल्हापुरातील सातवीत शिकणाऱ्या मुलाने जिंकले एक कोटी; पठ्ठ्याची गावातून काढली जंगी मिरवणूक

कोल्हापूरः मुरगुड तालुक्यातील सातवीत शिकणारा एक मुलगा अवघ्या काही तासात कोट्यधीश झाला असल्याची चर्चा सुरू आहे. सक्षम बाजीराव कुंभार असे या मुलाचे नाव असून त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन खेळात सहभागी होत. त्याने या ॲपवर तयार केलेल्या टीमने त्याला कोट्यधीश बनवला असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Kolhapur boy won 1 crore)

ड्रीम इलेव्हन हे एक ऑनलाईन अॅप्लीकेशन असून यामध्ये क्रिकेट सामना सुरू असताना व्हर्चुअल टीम तयार करून त्यावर आधी काही पैसे लावले जातात आणि सामना सुरू असताना व्हर्चुअल टीम मधील खेळाडूचे पॉइंट्स हे प्रत्यक्ष सुरू असलेल्या सामन्यातील खेळाडूने केलेल्या प्रदर्शनावर मिळत असतात. भारत- न्यूझीलंड सामन्यानंतर सक्षमने तब्बल एक कोटी जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर सक्षमची गावात मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. याचे व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

वाचाः Republic Day 2023 : ९०१ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार पोलिसांचाही समावेश

सातवीतला मुलगा झाला कोट्यधीश

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील सक्षम बाजीराव कुंभार या इयत्ता सातवीत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात त्याने तब्बल ७०,००,००० रुपये कमावले असल्याचा दावा सक्षमकडून करण्यात आला आहे. शिवाय काल रात्री त्याच्या अकाउंटवर जिंकलेली रक्कम ही जमा झाली असल्याचे फोटोत दिसत आहे.

सक्षमचे वडील बाजीराव कुंभार हे महावितरणमध्ये कर्मचारी आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या सक्षमला क्रिकेटवर अत्यंत प्रेम असून तो कोणताही क्रिकेट सामना पाहायचा सोडत नाही. करोना काळात शिक्षणासाठी त्याच्या हातात मोबाईल आला मात्र शिक्षणाबरोबर त्याने ड्रीम इलेव्हन या अॅप्लीकेशनवर आपलं अकाउंट सुरू केले तसेच त्याने त्यावर खेळ खेळण्यास देखील सुरू केले.

वाचाः देवदर्शनासाठी जाताना ९ जण गेले, मात्र ५ जणच माघारी येणार; एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं!

मंगळवारी झालेल्या सामन्यात त्याने तयार केलेल्या टीमने सर्वाधिक पॉईंट घेत रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने ऑनलाईन एक कोटी रूपये जिंकले असल्याचं म्हटलं असून टॅक्स कट होऊन ७०,००,००० ची रक्कम जमा झाली आहे. यानंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींमध्ये सर्वांनाच सुखद धक्का बसला. यानंतर ही रक्कम त्याच्या अकाउंटवर देखील जमा झाली यामुळे येथील उत्साही युवक आणि नातेवाईकांनी त्याची शहरातून मोटरसायकल रॅली काढून आनंद साजरा केला.

वाचाः लग्न करुन सासरी जाणाऱ्या लेकींना गावाकडून मायेची माहेरची साडी, ऐनापूर मुलींच्या पाठीशी उभं राहणार

Source link

dream 11 appindia vs new zealandkolhapur boy newskolhapur boy won 1 crorekolhapur live newsKolhapur newsकोल्हापूरच्या मुलाने जिंकले १ कोटी
Comments (0)
Add Comment