धुळे शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिक तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्या ३५ ते ४० वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता.
वाचाः महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट; मुंबई-पुण्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज
आज रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर मिल परिसरातील नागरिकांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर येत घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना अडवले व त्यांच्याकडील डिझेलच्या बाटल्या हिसकवण्याचा प्रयत्न केला.
वाचाः पोटनिवडणुकीसाठी आघाडीची तयारी; चिंचवडसाठी शिवसेना आग्रही तर कॉंग्रेसला कसबापेठचा प्रस्ताव
कार्यालयाबाहेरील काही काही आंदोलकांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व आंदोलनकर्त्यांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.