Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे

नवी दिल्लीः Airtel Increases Minimum Monthly Recharge Plan: भारती एयरटेल ने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपला एक स्वस्त प्लान बंद केला आहे. कंपनीने ९९ रुपयाचा प्लान बंद केला आहे. आता एकून ७ सर्कलमध्ये एअरटेलने सर्वात स्वस्त मंथली रिचार्जची किंमत १५५ रुपये केली आहे. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि नॉर्थ ईस्ट सर्कलमध्ये कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत आता ९९ रुपये ऐवजी १५५ रुपये झाली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये एअरटेलने हरियाणा आणि ओडिशा मध्ये सुद्धा ९९ रुपयाचा प्लान बंद केला होता. १५५ रुपयाच्या नवीन प्लानची तुलना ९९ रुपयाच्या प्लान सोबत केल्यास एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ५७ टक्के जास्त झाली आहे. ९९ रुपयाच्या प्लानमध्ये व्हाइस कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंद आणि २०० एमबी डेटा ऑफर केला जात होता.

१५५ रुपयाचा एअरटेल प्लान
एअरटेलच्या १५५ रुपयाच्या प्लानची वैधता २४ दिवसाची आहे. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर मिळते. या प्लानमध्ये १ जीबी मोबाइल डेटा मिळतो. ग्राहकांना ३०० एसएमएस सुद्धा मिळतात. एअरटेल ग्राहक या प्लानमध्ये ३०० एसएमएस वापरू शकतात. यानंतर लोकल एसएमएससाठी १ रुपया आणि नॅशनल एसएमएससाठी १.५ रुपये द्यावे लागतील. प्लानमध्ये मिळणारा डेटा संपल्यानंतर ५० पैसे प्रति एमबी या हिशोबाप्रमाणे चार्ज द्यावा लागेल. एअरटेलच्या या प्लानमध्ये Hellotunes आणि Wynk Music चे अॅक्सेस फ्री मिळते.

वाचाः भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

या शिवाय, एअरटेलच्या २०० रुपये पेक्षा कमी किंमतीत १७९ रुपयाचा प्लान सुद्धा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि २ जीबी मोबाइल डेटा मिळतो. तर १९९ रुपयाच्या प्लानमध्ये ३० दिवसाची वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि ३ जीबी मोबाइल डेटा ऑफर केला जातो. डेली डेटा ऑफर करणाऱ्या एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत २०९ रुपये आहे. या प्लानची वैधता २१ दिवसाची आहे. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. याशिवाय, एअरटेलचा हा प्लान १०० एसएमएस सोबत येतो. प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. या डेटाची लिमिट संपल्यानंतर कमी होवून 64Kbps होते.

वाचाः जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्सचे टॉप ३ फ्लिप फोन, किंमत १९११ रुपयांपासून सुरू

Source link

airtel hikes priceAirtel Increases Minimum Monthly Recharge PlanAirtel Increases Monthly Recharge PlanAirtel Increases Recharge PlanAirtel Planairtel plans
Comments (0)
Add Comment