कंपनीत रागाच्या भरात सुपरवायझरला संपवलं; ५ वर्ष पोलिसांनी हुलकावणी, मात्र आता एक चूक अन्…

औरंगाबाद : कंपनीत वाद घालून सुपरवायझरची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला एम. आय. डी. सी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. सोमेश सुधाकर इधाटे (वय २७ वर्ष, रा. शिरोडी खुर्द, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) असं आरोपीचं नाव आहे. हत्या केल्यानंतर सोमेश हा पश्चिम बंगालसह विविध राज्यात पाच वर्ष लपून बसला होता. मात्र आता तो आपल्या मूळ गावी येताच सापळा रचून पोलिसांनी सोमेशला अटक केली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपी इधाटे हा वाळूज परिसरातील श्री इंजिनियरिंग या कंपनीत जाऊन तेथील सुपरवायझर जगदीश प्रल्हाद भराड (वय ३५ वर्ष, रा.कळंबेश्वर, जि. बुलढाणा) याचा खून करून फरार झाला होता. एमआयडीसी वाळूज पोलीस, गुन्हे शाखेसह विविध पथके त्याचा शोध घेत होती. मात्र तो पश्चिम बंगाल, त्यानंतर जगनाथपुरी अशा विविध ठिकाणी जाऊन स्वत:ची ओळख लपवत फिरत होता.

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; शहरात एकच खळबळ

पोलीस पथकाने अनेकवेळा त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना यश आलं नाही. मात्र त्याच्या मूळ गावी पोलीस नजर ठेऊन होते. दरम्यान तो त्याच्या गावात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी फुलंब्री तालुक्यातील शिरोडी गावात सापळा रचला. आरोपी सोमेश येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तब्बल पाच वर्षानंतर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Source link

Aurangabad crime newsaurangabad murder caseaurangabad news todaymurder in aurangabadऔरंगाबाद ताज्या बातम्याऔरंगाबाद पोलीसऔरंगाबाद हत्या प्रकरण
Comments (0)
Add Comment