विदर्भात कालपासून वातावरणात अचानक बदल झाल्याने अकोला जिल्ह्यातील थंडी गायब झाली आहे. अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार अफगाणीस्थानवर चक्राकार वाऱ्याच्या स्वरूपात पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळं राजस्थानवर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून नैऋत्य उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे.
वाचाः महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट; मुंबई-पुण्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज
तामिळनाडूवर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. म्हणून २९ ते ३१ जानेवारीदरम्यान मध्य भारतात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हवामानाच्या या शास्त्रीय परिस्थितीमुळे पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशीम या चार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी साधारण पावसाची शक्यता आहे.
वाचाः प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; शहरात एकच खळबळ