राजेश खन्नांनी केलेली डिंपल कपाडियांना मारहाण, करिअरच्या त्या काळात स्वत:ला संपवण्याचा…

मुंबई : राजेश खन्ना यांना इंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. राजेश खन्ना यांचं स्टारडम इतकं होतं, की चाहते त्यांच्यासाठी आपल्या रक्ताने पत्र लिहित होते. पुढे काही वर्षांनंतर त्यांचं हे स्टारडम हळूहळू कमी होतं गेलं आणि ते डिप्रेशनमध्य गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या काळात त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते. यामुळे त्यांच्या पत्नी डिंपल कपाडिया यांच्यावर मोठा परिणाम झाल्याचं बोललं जातं.

एक काळ असा होता ज्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार राजेश खन्ना यांचे अनेक किस्से चाहत्यांमध्ये चर्चेत असायचे. काका म्हणून पॉप्युलर असलेल्या राजेश खन्नांसाठी देशभरातील चाहत्यांकडून इतकी पत्र यायची, की त्यांनी आलेल्या पत्राला उत्तर देण्यासाठी एक व्यक्तीला नोकरीवर ठेवलं होतं.

हेही वाचा – जेव्हा राजेश खन्ना यांनी उडवली होती अमिताभ यांची खिल्ली, क्लार्क वेळेवर येतात पण…

राजेश खन्ना – डिंपल कपाडिया

राजेश खन्ना यांचं करिअर डळमळीत झालं असताना त्यांनी स्वत:ला सर्वांपासून दूर केलं होतं. त्यामुळे राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या नात्यातही दुरावा आला होता. मीडियामध्ये त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा होत होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश खन्ना यांनी एकदा डिंपल यांना मारहाण केल्याचंही बोललं जातं. या चर्चांमुळे नंतर राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या नात्यात दुरावा आला आणि अभिनेत्रीने नंतर राजेश खन्ना यांचं घर सोडलं होतं.

हेही वाचा – राजेश खन्नांना आवडली नव्हती ऋषी – डिंपल यांच्या प्रेमाची निशाणी, मौल्यवान वस्तूबाबत असं काही केलं की…

आत्महत्येचा विचार

करिअरमध्ये अचानक मोठ्या उंचीवरुन खाली आल्यानंतर राजेश खन्ना डिप्रेशनमध्ये होते. याच काळात अभिनेत्याने वर्षभर स्वत:ला सर्वांपासून वेगळं केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिशय डिप्रेशनमध्ये गेलेल्या राजेश खन्नांना याकाळात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी १९७२ साली लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर १९८३ साली डिंपल कपाडिया या राजेश खन्नांपासून वेगळ्या राहू लागल्या. परंतु, त्यांनी घटस्फोट कधीच घेतला नाही. दरम्यान, २०१२ मध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं.

Source link

dimple kapadiarajesh khannarajesh khanna suicide thoughtडिंपल कपाडियाराजेश खन्ना
Comments (0)
Add Comment