डूडल कलाकृतीला खूपच बारकाईने हाताने कापलेल्या कागदापासून तयार करण्यात आले आहे. डूडलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडची झलक दिसत आहे. यात राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, सीआरपीएफ मर्चिंग दल, आणि मोटर सायकल सवार याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात एक यूट्यूब व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या डूडलला पेपरने कापून तयार करण्यात आले आहे. कलाकार पार्थ हे सांगतात की, हे सगळं करण्यासाठी ४ दिवस लागले असून रोज कमीत कमी ६ तास काम केले आहे.
वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे
प्रजासत्ताक दिवसानिमित्त सन्मान
आजच्याच दिवशी म्हणजे १९५० रोजी भारताने संविधानाला स्विकारले होते. या दिवसापासून भारतात खरी लोकशाही अस्तित्वात आली आहे. प्रजासत्ताक भारतात १९४७ मध्ये ब्रिटिश राज्य पासून मुक्तता मिळाली होती. यानंतर तात्काळ भारतात संविधान निर्मितीचे कार्य सुरू करण्यात आले होते. भारताच्या संविधान सभेने संविधान डॉक्यूमेंट्सवर चर्चा, संशोधन आणि अनूमोदन करण्यात दोन वर्षे घालवली. त्यानंतर भारतात बनवण्यात आलेले लिखित संविधान स्वीकारले. या संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
वाचाः भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस
वाचाः जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्सचे टॉप ३ फ्लिप फोन, किंमत १९११ रुपयांपासून सुरू