मी आयुष्यात आतापर्यंत अनेक टीव्ही शो आणि चित्रपट केले आहेत पण MHJ केल्यानंतर मला मिळालेली प्रसिद्धी आणि पाठिंबा खूप मोठा आहे. प्रेक्षकांना माझं विनोदाचं टायमिंग आणि MHJ मधील परफॉर्मन्स आवडला आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. या शोने माझ्या आयुष्यात खूप सकारात्मकता आणली आणि मला एक ओळख दिली, असं तो सांगतो.
वर्सोव्यातील ऑफिसमध्ये ओपन ऑडिशन व्हायचे तेव्हा मी लोकांकडं काम मागायचो. मी अजूनही कधी कधी तिथं जातो. तिथं ऑडिशनला गेल्यावर तुम्हाला ५० रुपये आणि बिस्किटांचे पॅकेट आणि कॉफी द्याचचे. त्या बिस्किटाच्या पाकिटावर आणि कॉफीवर मी दिवस काढायचो. मी अजूनही माझ्या आठवणींना उजाळा देतो आणि भावुक होतो. अखेर चांगले दिवस आले याचा मला आनंद आहे.
एक काळ असा होता की मला कॉफी देखील परवडत नव्हती पण आता महागड्या कॉफी पितो. आणि गरजेच्या गोष्टींवर पैसेही खर्च करतो. संघर्षाचे दिवस आणि आजचे दिवस यात खूप फरक आहे.
मी माझ्या आयुष्यात अनेक अनुभवी लोकांना भेटलो. त्यांच्या विचारातून मी खूप काही शिकलो आहे. मला अशा लोकांनाही भेटायला मिळाले जे खूप सर्जनशील आहेत आणि त्यांची कला आवडते. या गोष्टी मला अधिक कष्ट करायला प्रेरणा देतात आणि प्रोत्साहन देतात, असं तो सांगतोय.
पृथ्वीक प्रताप लवकरच बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. ‘क्लास ऑफ ८३’ शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसने आणि गौरव वर्मा यांनी सहनिर्मित केला आहे.