काय आहे व्हिडिओत?
धनंजय मुंडे यांनी हा व्हिडिओ आपल्या बीडमधील निवासस्थानी चित्रित केला आहे. या व्हिडिओत असे दिसत आहे की, धनंजय मुंडे पलंगावर पहुडले आहेत आणि त्यांच्या बाजूला त्यांची कन्या आदिश्री ही उभी आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या हातात भारताचा तिरंगा घेतला आहे आणि ते आपल्या मुलीला प्रजासत्ताक दिन म्हणजे काय याबाबत माहित देत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- झाकीर हुसेन, मुलायमसिंग यादव, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्कार… वाचा संपूर्ण यादी
मुंडे या व्हिडिओत आपल्या मुलीला सांगत आहेत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना नोव्हेंबर महिन्यात तयार केली. त्यानंतर सरकारने ती स्वीकारली. मग २६ जानेवारीपासून आपल्या देशात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळेच आपण २६ जानेवारी या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे म्हणतो.
क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कर्मवीर दादासाहेब इदाते आणि विचारवंत रमेश पतंगे यांना पद्मश्री
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘अपघातामुळे सध्या घरी विश्रांती घेत असताना माझी मुलगी आदीश्रीसोबत गप्पा मारायला वेळ मिळतो आहे. प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या तिच्या प्रश्नाचे समाधान केले. राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात.’
क्लिक करा आणि वाचा- सद्गुरू वामनराव पै याच्या पत्नी शारदामाई पै यांचे निधन, वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. त्यांच्या छातीला मार लागला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.