Pune Fire : पुण्यात दुकानांना भीषण आग, ३ दुकाने आगीत जळून खाक, आगीचे कारण झाले स्पष्ट

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात दुपारच्या सुमारास ३ दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत भंगाराचे दुकान, गादी घर आणि रद्दी डेपो अशी दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास ही आग लागली होती. दुकानात काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानात आग लागली.

अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करीत ही आग विझवण्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.

क्लिक करा आणि वाचा- प्रजासत्ताक दिन म्हणजे काय रे बाबा?, धनंजय मुंडेंच्या लेकीचा व्हिडिओ तुफान व्हायरल; मुलीला सांगितले मर्म

मोठा अनर्थ टळला

ही आग ठिणगी पडून लागल्याचे स्पष्ट झाले आहे. बघता बघता या आगीने मोठे रूप धारण केले. शेजारी असणाऱ्या भंगार दुकान आणि रद्दी डेपोमध्ये ही आग पसरली आणि तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आली. स्वारगेटचा हा भाग मोठ्या वर्दळीचा आहे. त्यामुळे तात्काळ अग्नीशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

क्लिक करा आणि वाचा- झाकीर हुसेन, मुलायमसिंग यादव, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्कार… वाचा संपूर्ण यादी

आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान

अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्नीशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कर्मवीर दादासाहेब इदाते आणि विचारवंत रमेश पतंगे यांना पद्मश्री

Source link

pune firesevere fire broke out in punethree shops gutted in the fireपुण्यात भीषण आग३ दुकाने जळून खाक
Comments (0)
Add Comment