तक्रारदार ४९ वर्षीय असून हे धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील सन-२०१५ ते २०२० या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षणा बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून ग्रामसेवक अनिल गायकवाड यांच्याकडे मागितली होती. मात्र त्यांना ही माहिती वेळेत न मिळाली नाही.
क्लिक करा आणि वाचा- श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकून उडवून देण्याची धमकी; हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल
ही सविस्तर माहिती देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम अडीच हजार रुपये एवढी ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पथकाने प्रजासत्ताकदिनी सापळा रचून धरणगाव अमळनेर रोडवरील सिंधु ढाबा येथे तक्रारदाराकडून अडीच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक अनिल गायकवाड यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- प्रजासत्ताक दिन म्हणजे काय रे बाबा?, धनंजय मुंडेंच्या लेकीचा व्हिडिओ तुफान व्हायरल; मुलीला सांगितले मर्म
पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरक्षिक संजोग बच्छाव , पोलीस निरिक्षक एन.एन.जाधव, बाळू मराठे, ईश्वर धनगर, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रविंद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
क्लिक करा आणि वाचा- झाकीर हुसेन, मुलायमसिंग यादव, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्कार… वाचा संपूर्ण यादी