Pune News : नोकरीच्या आमिषाने लॉजवर बोलावलं, पुण्यात विवाहितेवर तिघांकडून अत्याचार

पुणे : पोटा पाण्याची भूक मिटवायला कामाची गरज पडते. त्यासाठी आपल्याला नोकरी मिळावी यासाठी आपण पुर्णत: प्रयत्न करतो. मात्र, काही नराधम याचाच गैरफायदा घेतात आणि लोक त्यालाच बळी पडतात. पुण्यातल्या कोंढवा येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Dunzo या ऑनलाईन डिलिव्हरी अ‍ॅप कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विवाहितेला लॉजवर बोलवून घेतले.

त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर, त्यांनी नराधमाच्या मित्रांनी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेकडून एक लाख रुपये उकळले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर बलात्कार, खंडणी, धमकावणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला आहे.

श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकून उडवून देण्याची धमकी; हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघं आरोपींपैकी एकाने फिर्यादी विवाहितेला तो त्यांच्या पतीचा मित्र आहे, असं सांगून त्यांना डिलिव्हरी कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवलं. त्यानंतर एक डिलिव्हरी द्यायची आहे, असं सांगून उंड्री परिसरातील एका लॉजवर बोलावून घेतले. तेथे त्यांच्यावर त्याने बलात्कार केला.

तिघं नराधम यावर थांबले नाहीत. त्यांच्यातल्या एका मित्राने फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी महिलेकडून एक लाख रूपये उकळले. त्यानंतर तिसर्‍या आरोपीने फिर्यादीला धमकावलं. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सानिया मिर्झाची ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक, हजारो प्रेक्षकांमधून धावत येत लेकाने घेतली गळाभेट, पाहा VIDEO

Source link

Pune crime newspune dunzo app crime newspune kondhwa woman rape newspune local newsपुणे dunzo अॅप क्राईम बातम्यापुणे कोंढवा महिलेवर बलात्कार बातम्यापुणे क्राईम बातम्यापुणे लोकल बातम्या
Comments (0)
Add Comment