जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा, भाजपातून ठाकरे गटात गेलेल्या हिरेंना भुसेंचा चिमटा

नाशिक :अद्वय हिरे भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यांच्या या प्रवेशाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आहे.

अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ‘लोकशाहीत कुणालाही कुठेही जायचे अधिकार आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेल्या घरी त्यांनी सुखात रहावे, ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे’ असा चिमटा दादा भुसे यांनी हिरेंना काढला आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दादा भुसे शिंदे सेनेसोबत गेले. शिंदे गटाची भाजपशी युती झाली. या घडामोडीनंतर भुसेंविरोधात जोरदार आघाडी उघडणाऱ्या डॉ. अद्वय हिरे यांची कोंडी झाली होती. अखेर त्यांनी ठाकरे गटाला जवळ केले आहे.

नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाला खिंडार पडले असून शिंदे गटात मात्र जोरदार इन्कमिंग सुरु आहे. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाला भाजपच्या नेत्याला आपल्याकडे वळवण्यात यश आले आहे. भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ.अद्वय हिरे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्के बसल्यानंतर आता भाजपला मालेगावमध्ये मोठा धक्का बसणार आहे. त्यासोबतच अद्वय हिरे विरुद्ध दादा भुसे असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. यावरच दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देताना ‘गेल्या घरी त्यांनी सुखात रहावे, ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे’, असे वक्तव्य केले आहे.

तीन वर्ष पोटात ठेवलेले ते आता ओठावर का आले? जयंत पाटील यांना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेक चर्चा होत आहेत. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जयंत पाटलांना सवाल केला आहे, की ‘असं असेल तर मग इतके वर्ष जयंत पाटील गप्प का होते? तीन वर्ष पोटात ठेवलेले ते आता ओठावर का आले?’ असा खडा सवाल दादा भुसे यांनी पाटलांना केला आहे.

हेही वाचा : नाना पटोलेंचा थोरातांना मोठा धक्का, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

दरम्यान यावेळी बोलताना ‘प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक नियोजन केले जाते. संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर राज्याचे बजेट सादर केले जाते. त्या संदर्भात आज नियोजनाची बैठक झाली आहे. लवकरच वित्त मंत्री या संदर्भात आढावा घेणार आहेत. अशी माहितीही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

हेही वाचा : नाशकात भाजपचा पाठिंबा आम्हालाच, संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य संघटने’च्या उमेदवाराचा दावा

Source link

advay hireDada Bhusedr advay hirayMaharashtra Political Newsshivsena uddhav balasaheb thackerayअद्वय हिरेदादा भुसेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment