शाहरुख खानबद्दल काय म्हणाले जावेद अख्तर?
पश्चिम बंगालमधील कोलकता इथं आयोजित करण्यात आलेल्या एका साहित्यविषयक कार्यक्रमात जावेद अख्तर सहभागी झाले होते. जावेद यावेळी म्हणाले की, ‘कोलकाता इथल्या लोकांचा स्वभाव अतिशय साधा,सरळ आहे. हे लोक खूपच बुद्धीमान देखील आहेत. मी दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होत असतो. खरे तर मी नास्तिक आहे परंतु हे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. या कार्यक्रमांना कायमच भरभरून प्रतिसाद मिळतो.’
हे वाचा-बॉलिवूडला ‘पठाण’ची होती गरज! या कारणांमुळे शाहरुखच्या सिनेमाचं होतंय कौतुक
जावेद यांनी याच कार्यक्रमात बॉलिवूड सिनेमांवर सुरू असलेल्या बहिष्काराच्या ट्रेंडबाबत मत व्यक्त केलं ते म्हणाले की, ‘आता बॉलिवूड सिनेमांवरील बहिष्काराचा ट्रेंड आता चालणार नाही.’ याचवेळी त्यांनी शाहरुखबाबतही त्यांचे मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ‘सध्या शाहरुखबाबत जे काही बोलले जात आहे ते अत्यंत निरर्थक आहे. तो एक अतिशय सज्जन व्यक्ती आहे. त्याच्या इतका धर्मनिरपेक्ष व्यक्ती कुणीच नाही. मी त्याच्या घरातील वातावरण मी पाहिलं आहे. तो कसा राहतो, तसंच त्याच्या घरी सर्व प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.’ जावेद यांनी शाहरुखचे केलेले कौतुक सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
हे वाचा-बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चं वादळ; अवघ्या पाच दिवसातच कमावणार २०० कोटी!
४ वर्षांनी शाहरुखने केले दमदार कमबॅक
दरम्यान अभिनेता शाहरुखचा पठाण सिनेमा बुधवारी २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला असून वर्ल्डवाइड या सिनेमाने दोनच दिवसात १०० कोटींची कमाई केली. पठाण सिनेमाचे पोस्टर रीलिज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत होता, कारण शाहरुख ४ वर्षांनी या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार होता. त्यानंतर सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्याची चर्चा झाली. यातील दीपिकाच्या बोल्ड लूकमुळे मोठा वादही निर्माण झालेला. त्यानंतर पठाणवर बॉयकॉटचे सावट पाहायला मिळाले. दरम्यान आता पठाण प्रदर्शित झाल्यानंतर बॉयकॉट गँगचे ध्येय पूर्ण न झाल्याचे चित्र आहे. देशभरात सिनेमा हाउसफुल्ल आहे.