वसंत मोरेंनी निष्ठावंतांना डावललं, घरी मुलाखत घेत नियुक्ती, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा आरोप

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात पक्षाची ताकद वाढण्यासाठी काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना मनसेकडून निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी वसंत मोरे यांच्या निरीक्षणाखाली बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नवे पदाधिकारी देण्यात आले आहेत. मात्र या नियुक्तीनंतर भोर तालुक्यातील मनसेचे नेते आणि मनसेचे माजी तालुका अध्यक्ष राहुल पवार यांनी वसंत मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत, नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

राहुल पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भोर तालुक्यातील अध्यक्ष नेमताना वसंत मोरे यांनी निष्ठावंतांना डावलून, नात्यातील निकटवर्तीयांना अध्यक्षपद दिले, असा आरोप पवार यांनी केला आहे. भोर तालुक्यात अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या दिपक पांगारे यांची मुलाखत, वसंत मोरे यांनी मुंबईला जाण्याच्या आदल्या रात्री घरी बोलवून घेतली, असा आरोप राहुल पवार यांनी केला आहे.

हेही वाचा : नाना पटोलेंचा थोरातांना मोठा धक्का, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त

१७ वर्ष काम करूनही निष्ठेचं फळ मिळत नसल्याने मनसेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याचे पवार म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी यात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे नव्याने करण्यात आलेल्या अध्यक्ष नियुक्तीनंतर पुण्यात मनसेमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा : जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा, भाजपातून ठाकरे गटात गेलेल्या हिरेंना भुसेंचा चिमटा

Source link

Maharashtra Political Newspune mns politicsrahul pawarraj thackerayVasant Moreपुणे भोर मनसे तालुका अध्यक्षपुणे मनसे वादराज ठाकरेराहुल पवारवसंत मोरे
Comments (0)
Add Comment