प्रजासत्ताक दिनी दोन भावंडांकडून घोड्यावर चढण्यापूर्वी ध्वजारोहण, गोंदियातील भावांची चर्चा

गोंदिया: संपूर्ण देशात आज ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्याचवेळी गोंदियातील प्रजासत्ताक दिन एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला. आपल्याला लग्न म्हटलं की डोळ्यासमोर बँड, बाजा आणि बारात हेच येतं. मात्र, आज गोंदियाच्या चांडक कुटुंबीयांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या लग्नाची सुरुवात आगळ्यावेगळ्या पद्धतीने केली. येथे नवरदेव झालेल्या दोन भावंडांनी आधी ध्वजारोहण केलं आणि नंतरच त्यांनी मंडपात पाय ठेवला. त्यामुळे या भावंडांच्या लग्नाने सर्वांचे लक्ष्य आकर्षित केले.

लग्न मंडपी जाताना वर-वधूला मतदान करुन जाताना आपण नेहमीच पाहतो. मात्र, गोंदियाच्या चांडक कुटुंबातील राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मंडपी जान्यापूर्वी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहन करत देशाच्या संविधानाला बळकट करण्याचं काम करत सामाजिक संदेश दिला आहे.

हेही वाचा -मोठी बातमी! छातीत दुखू लागल्याने अभिनेता अन्नू कपूर रुग्णालयात दाखल

२६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना अमलात आली. त्यामुळे या दिनाची सार्वांना आठवण राहावी यासाठी राम आणि श्याम या दोन भावंडांनी लग्न मडंपी जान्यापूर्वी ७३ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन केले. तर चांडक कुटुंबातील वऱ्हाड्यांनी यावेळी राष्ट्रगान करत तिरंग्याला मानवंदना देत सामाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं आहे.

हेही वाचा -प्रसिद्धी डोक्यात गेली, ६ वर्षात कोट्यधीश झालेल्या युट्युबरने असा सल्ला दिला की चाहते संतापले…

राम आणि श्याम हे दोघेही उद्योगपती आहेत. ते गोंदियातील अर्जुनी मोरगाव येथे राहातात. या दोघांचा आज एकाच मांडवात विवाह संपन्न झाला. लग्नापूर्वी ध्वजारोहण करण्याची संकल्पना ही त्यांच्या काकांची होती.

हेही वाचा -रात्रभर आई-वडील घरी परतले नाहीत, मुलं शोधायली निघाली; तोपर्यंत उशीर झाला होता…

Source link

flag hoistinggondiagondia newsRepublic Day 2023republic day celebrationsiblings hosted flags before weddingtwo siblings hosted flagwedding in gondia
Comments (0)
Add Comment