मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. असंच स्थान अभिनेता श्रेयस तळपदे यानं निर्माण केली. असा हा हरहुन्नरी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade Birthday) याचा वाढदिवस आहे.
श्रेयस त्याच्या व्यावसायिक आयुष्यात जितका लोकप्रिय आहे. तितकीच त्याची लव्हस्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे. अभिनेता श्रेयसचा जन्म २७ जानेवारी १९७६ मध्ये मुंबईत झाला. लहानपणापासूनच श्रेयसला अभिनयाची आवड होती. त्यामुळे याच क्षेत्रात करीअर करायचा निर्णय त्यानं घेतला होता. निर्णय घेतला खरा पण यशस्वी होण्याआधी त्यानं खूप चढ उतार अनुभवले आहेत. निर्मिती, दिग्दर्शक तसंच वॉइस ओव्हर यांसारख्या अनेक क्षेत्रात श्रेयसनं काम केलं. श्रेयसनं २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इक्बाल’ (Iqbal) या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं. ‘इक्बाल’नंतर त्यानं अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. अभिनयाच्या क्षेत्रात श्रेयस यशस्वी ठरला. अशा या अभिनेत्याची लव्हस्टोरी देखील तितकीच फिल्मी आहे.
अशी जुळली श्रेयसची रेशीमगाठ
श्रेयसला २००० मध्ये कॉलेजच्या एका फेस्टिव्हलसाठी बोलवलं होतं. कॉलेजच्या त्याच फेस्टिव्हलची दीप्ती ही सेक्रेटरी होती. फेस्टिव्हलला आलेल्या श्रेयसनं जेव्हा दीप्तीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. दीप्तीला पाहिल्यानंतर केवळ चार दिवसांतच श्रेयसनं तिला प्रपोजही केलं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर,२००४ मध्ये त्यांनी लग्न केलं.
श्रेयस आणि दीप्तीनं लग्नानंतर १४ वर्षांनंतर ४ मे २०१८ मध्ये सरोगसीद्वारे मुलीचे आई-बाबा झाले. त्यांनी मुलीचं नाव आद्या असं ठेवलं आहे.श्रेयसच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ओम शांती ओम, गोलमाल सीरिज, वाह ताज आणि इकबाल यांसारख्या हिंदी तसंच अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आतापर्यंत श्रेयसनं ४५ सिनेमांत काम केलं आहे.
झी मराठीवरून प्रसारित झालेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयसनं प्रदीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. या मालिकेत श्रेयसनं हर्षवर्धन ही भूमिका साकारली होती. मालिकेत त्याच्याबरोबर संकर्षण कऱ्हाडे, प्रार्थना बेहेरे, मायरा वायकुळ यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. नुकतीच ही मालिका संपली असून प्रेक्षकांनी त्या मालिकेवर आणि मालिकेतील सर्व पात्रांवर भरभरून प्रेम केलं होतं.