कमल हसन आणि सारिका यांनी १९८८ मध्ये लग्न केलं होतं. पण लग्नाच्या १६ वर्षांनंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २००४ साली या दोघांचा घटस्फोटही झाला. या दोघांना श्रृती आणि अक्षरा अशा दोन मुलीसुद्धा आहे. कमल आणि सारिका वेगळे झाले असले तरी दोन्ही मुलींना आई-वडिलांचं प्रेम मात्र मिळतं. नुकतंच श्रृतीनं आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केलं. यावेळी तिनं त्या दोघांच्या घटस्फोटावर आनंद व्यक्त केला. तिचं म्हणणं आहे की, ‘जर ते दोघं एकत्र आनंदी राहू शकत नव्हते तर चांगलंच झालं जे की ते वेगळे झाले.’
काय म्हणाली होती श्रृती हसन?
एका मुलाखतीत श्रृतीनं तिच्या आई वडिलांच्या नात्यावर तसंच घटस्फोटावर भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, ‘मी त्यांच्या नव्या आयुष्यासाठी खूप उत्साहित होते. मला आनंदच आहे की, ते दोघं वेगळे झाले. कारण मला वाटतं जर दोन व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत. तर मग कोणतंच कारण त्यांना एकत्र ठेवू शकत नाही. पण ते खूप चांगले आई-वडील आहेत. खासकरून माझ्या बाबांशी माझं खास बॉन्डिंग आहे. माझी आई माझ्या आयुष्यांचा महत्त्वाचा भाग आहे. हे आमच्या सर्वांसाठी योग्य होतं. ते दोघंही खूप चांगले व्यक्ती आहेत. पण एकत्र ते दोघं खूश राहू शकत नाही. ते दोघं एकत्र राहिले तर त्यांचा चांगुलपणा संपून जाईल. ते दोघं वेगळे झाले तेव्हा मी खूप लहान होते. हे खूप सोपं होतं आणि आम्ही सगळेच आनंदी होते.’