नांदेड – शिवाजी महाराजांची बदनामी प्रकरणी श्री श्री रविशंकर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अन्यथा नांदेड येथील कार्यक्रमास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तीव्र विरोध करणार.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांचा महासत्संगाचा कार्यक्रम दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होत असून या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे सर्व शिवप्रेमी व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, तीव्र विरोध करणार आहे. अखंड जगाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांचा दुर दुर पर्यंत कसलाही संबंध नसताना देखील *श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर रामदासस्वामी हे स्वराज्याचे राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज लढाया करुन थकून गेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जिरेटोप व तलवार रामदासाच्या चरणी अर्पण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करून रामदासाने स्वराज्य घडवले आहे. तसेच रामदास शिवरायांना म्हणतो की शिवाजी शिपाई म्हणून माझे एक काम करशील का.? अशा आशयाचा व्हिडिओ बनवून तो आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करुन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तसेच महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने देखील केलेली आहेत. तसेच शासनाकडे अनेक वेळा तक्रारीचे निवेदने देखील दिलेले आहेत. परंतु अद्यापही श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे श्री श्री रविशंकर यांनी दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे येण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी. अन्यथा सदर कार्यक्रमाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करुन विरोध करणार आहोत याची गांभीर्याने नोंद घ्यावी हि विनंती.यावेळी जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनुरे जिल्हाध्यक्ष रुपेश पावडे जिल्हाध्यक्ष सदानंद पुयड प्रकाश पाटील घोगरे भागवत ढेपे निरंजन कदम व शिवप्रेमी
आपला.
माधवराव पाटील देवसरकर प्रदेशाध्यक्ष
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य.