पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील चार विद्यार्थी कानसुर येथील असणाऱ्या श्री चक्रधर स्वामी विद्यालय येथे गुरुवारी २६ जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जात होते. सकाळी साडेसातच्या सुमारास महाविद्यालयापासून एक किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना किंवा धडक बसून (निश्चित माहीती नाही ) त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यावेळी दुचाकीवर बसलेले व महाविद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेले चार विद्यार्थी जखमी झाले होते
वाचाः कुनोतून आली वाईट बातमी; मादी चित्त्याची प्रकृती खालावली, किडनीला संसर्ग, डॉक्टर म्हणतात…
शंतनू सोनवणे या विद्यार्थ्याचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर अपघातामध्ये जखमी असलेल्या तिघांवर आंबेजोगाई आणि लातूर याठिकाणी उपचार करण्यात येत होते. दरम्यान लातूर येथे उपचार सुरू असताना अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण याचा आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे डाकू पिंपरी गावामध्ये हळहळ वेक्त केली जात आहे.
वाचाः पोहायला गेलेली ३ मुलं परतलीच नाहीत; पाण्याशेजारी कपडे आढळल्याने बुडाल्याची भीती
असा झाला अपघात
परभणीच्या पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील चार विद्यार्थी काल गाडीवरून ध्वजवंदनासाठी कानसुर येथील विद्यालयात जात होते. गाडी चालवत असताना विद्यार्थी गाडीवर रील बनवत होते. याच दरम्यान हा अपघात झाला. अपघातात गाडीवरील चार विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळेच त्यांना उपचारासाठी लातूर आणि आंबेजोगाई येथे दाखल करण्यात आले. त्यातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचाः वसंत मोरेंनी निष्ठावंतांना डावललं, घरी मुलाखत घेत नियुक्ती, मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा आरोप