Coca-Cola phone ची माहिती टिपस्टर मुकुल शर्मा यांच्याकडून देण्यात आली आहे. फोनचा फोटो शेअर करण्यासोबत मुकुलने म्हटले की, हा मोबाइल या तिमाहीत म्हणजेच मार्च महिन्याआधी भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे. या फोन द्वारे कोका कोला स्मार्टफोन ब्रँड रियलमी सोबत पार्टनरशीप करण्याची शक्यता आहे. चर्चा अशीही आहे की, हा फोन Realme 10 4G फोनचा रिब्रँडेड व्हर्जन म्हणून समोर येवू शकतो. फोटोत फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सुद्धा दिसत आहे.
वाचाः Airtel ग्राहकांना मोठा झटका, सर्वात स्वस्त प्लान बंद, आता द्यावे लागतील ५७ टक्के जास्त पैसे
Realme 10 4G Specifications
Realme 10 मध्ये 6.5-inch FHD+ AMOLED डिसप्ले दिला आहे. जो 90Hz refresh rate सपोर्ट सोबत येतो. तर फोनच्या फ्रंटवर पंच होल कटआउट आणि नॅरो बेजल्स दिले आहेत. याशिवाय, फोनमध्ये पॉवर देण्यासाठी MediaTek Helio G99 SoC दिले आहे. या प्रोसेसर सोबत ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉयड १३ आधारित Realme UI कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्स वर रन करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा दिला आहे. फ्रंट वर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअप देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC fast charging सपोर्ट दिला आहे.
वाचाः Google Doodle on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने बनवले खास डूडल