HSC Exam: बारावी विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट, ‘या’ स्टेप्स करा फॉलो

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (२७ जानेवारी) हॉलतिकीट मिळणार आहेत. शिक्षण मंडळातर्फे लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा सुरु होणार आहे. परीक्षेचे हॉलतिकीट महाविद्यालयाच्या लॉग-इनमध्ये डाउनलोड करण्यासाठी २७ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून शाळांना हॉलतिकीट डाउनलोड करून वितरित करता येणार आहे. तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे मंडळाने स्पष्ट केले.

हॉलतिकिटांच्या अनुषंगाने शिक्षण मंडळाने मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना केल्या आहेत. ऑनलाइन प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. औरंगाबाद विभागात बारावी परीक्षेला पाच जिल्ह्यांतून एक लाख ६८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

अशा आहेत सूचना

– प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

– प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्याबाबतच्या दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात.

– फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत मंडळाकडे पाठवावी.

-प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय पत्र असा शेरा देऊन प्रवेशपत्र देण्यात येईल.

– फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

SSC HSC Exam: दहावी, बारावीच्या परीक्षार्थींवर असणार सीसीटीव्हीची नजर

Source link

12thhall ticketHSC ExamImportant updateMaharashtra boardबारावी परीक्षाबारावी हॉलतिकीटमहाराष्ट्र बोर्ड
Comments (0)
Add Comment